Site icon e लोकहित | Marathi News

Attack on MLA । काँग्रेस आमदाराची फोडली कार, कार्यक्रमावेळी घडली धक्कादायक घटना

Attack on MLA

Attack on MLA । नांदेड : मागील काही दिवसांपासून राजकीय नेत्यांवरील हल्ल्यांच्या (Attacks on political leaders) घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे राज्यात घबराटीचे वातावरण तयार झाले आहे. नुकतीच भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या गाडीवर दगडफेक झाली. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या चिपळूणमधील कार्यालयासमोर निलेश राणे यांचा ताफा आल्यावर हा हल्ला झाला. (Latest marathi news)

Ajit Pawar । ‘अजित दादा भाषणाच्यावेळी बाथरुममध्ये पळायचे’; बड्या नेत्याचं सर्वात मोठं वक्तव्य

राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याची घटना ताजी असताना आता काँग्रेस (Congress) आमदाराच्या गाडीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. नांदेडमधील काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांची गोडी फोडली आहे. नांदेडमधील पिंपळगाव येथील ही घटना असून परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Attack on MLA in Nanded) दरम्यान, मोहन हंबर्डे (Mohan Humbarde) हे पिंपळगाव निमजी गावात किर्तनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. (Attack on Congress MLA)

Supriya Sule । सुप्रिया सुळेंना धक्का बसणार? अजित पवार बारामतीतुन तगडा उमेदवार उभा करण्याच्या तयारीत

त्यावेळी काही अज्ञातांकडून त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार हंबर्डे यांना सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात वातावरण तापलं असून राज्यातील काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत.

Manoj Jarange । मनोज जरांगेंच नारायण राणेंसंदर्भात मोठे वक्तव्य; म्हणाले, “तू माझ्यापेक्षा वयाने…”

Spread the love
Exit mobile version