Lok Sabha Election । लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. राज्यात दररोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अधिकृतपणे जाहीर झाला आहे. पण उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा अजूनही सुटला नाही. या जागेबाबत काँग्रेस (Congress) आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरु आहे. (Latest marathi news)
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) यांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं, असा प्रस्ताव काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी घोसाळकर यांना दिला आहे. पण आपण ठाकरे गटाकडूनच आगामी निवडणूक लढू, असं मत घोसाळकर यांनी व्यक्त केले आहे. इतकेच नाही तर हा मतदारसंघ ठाकरे गटाला सोडावा, असा आग्रह उत्तर मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
Ashish Jaiswal Accident । सर्वात मोठी बातमी! शिवसेना आमदाराच्या कारचा भीषण अपघात
उत्तर मुंबईतल्या काही ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची भेट घेतली अशी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. “मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. फक्त लोकसभेला जाणं योग्य नाही. येत्या दोन दिवसात निर्णय अपेक्षित आहे”, अशी प्रतिक्रिया विनोद घोसाळकर यांनी दिली. त्यामुळे आता काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.