Site icon e लोकहित | Marathi News

Politics News । लोकसभेपूर्वी काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याने दिला अध्यक्षपदाचा राजीनामा

Politics News । राज्यात लोकसभा निवडणुकीची (Loksabha election 2024) रणधुमाळी सुरु आहे. राज्यात यंदा कोणाचे सरकार येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. महाविकास आघाडी आणि महायुतीने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पण काही जागांवर पेच कायम आहे. अशातच लोकसभेपूर्वी काँग्रेसला (Congress) सर्वात मोठा धक्का बसला आहे. (Latest marathi news)

Ajit Pawar । मुख्यमंत्री केव्हा होणार? कार्यकर्त्यांच्या प्रश्नाला अजित पवारांनी दिलं उत्तर

दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अरविंदर सिंग लवली (Arvinder Singh Lovely) यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे दिला आहे. लोकसभा निवडणुकीची उमेदवारी नाकारल्याने लवली हे पक्षावर नाराज होते. विशेष म्हणजे दिल्लीत आप आणि काँग्रेस यांच्या आघाडीमुळे लवली नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

Viral News । लग्नाच्या दिवशी केली ही सर्वात मोठी चूक; नवरीने थेट लग्नच मोडले

दिल्ली काँग्रेस पक्षावर खोटे, बनावट आणि गैरप्रकार तसेच भ्रष्टाचाराचे आरोप लावण्याच्या आधारावर स्थापन झालेल्या पक्षाशी युती करण्याच्या विरोधात लवली होते, असं असताना पक्षाने दिल्लीत आपशी युती करण्याचा निर्णय घेतला, असं अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिलं आहे. लोकसभेपूर्वी हा काँग्रेससाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

Prakash Shendge । राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! प्रकाश शेंडगेंच्या कारवर चपलांचा हार आणि शाईफेक

Spread the love
Exit mobile version