
Congress । मागच्या काही दिवसापासून काँग्रेसला अनेक मोठे धक्के बसले आहेत. सध्या देखील धाराशिवमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. मधुकर चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोलापूरमध्ये भेट घेतली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
राम सातपुते आणि रणजितसिंह निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल देवेंद्र फडणवीस हे सोलापूर या ठिकाणी आले असताना त्यांनी भेट घेतली होती. त्यावेळी माजी मंत्री बसवराज पाटील हे देखील सोबत होते. मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनिल चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने काँग्रेसला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसणार आहे.
Baramati Crime । बारामती हादरली! अल्पवयीन मुलांकडून विद्यार्थ्याची हत्या
धाराशिव या ठिकाणी सुनिल चव्हाण यांचा पक्षप्रवेशसोहळा पार पडणार आहे. सुनिल चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मात्र मधुकर चव्हाण प्रवेश करणार नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. सुनिल चव्हाण यांनी त्यांच्या काँग्रेसमधील पदाचा राजीनामा दिला असून ते भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.