Congress | मागील वर्षी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेमध्ये (Shivsena) बंड करून भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्यांनी पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला. त्यापाठोपाठ एकाच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) देखील खिंडार पडले. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या ८ सहकारी नेत्यांसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. अशातच आता लवकरच काँग्रेस पक्षदेखील फुटणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी काँग्रेसबाबत एक दावा केला आहे. कोल्हापुरमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. बोलताना ते म्हणाले की, “शरद पवार आम्हाला भाजपची बी टीम समजत होते. परंतु, आज त्यांच्या पक्षाची काय अवस्था झाली आहे हे तुम्हाला दिसतच आहे. राज्यात शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी फुटली, आता काँग्रेसही फुटणार आहे,” असा खळबळजनक गौप्यस्फोट के. चंद्रशेखर राव यांनी केला आहे.
Milk Rate । म्हशीच्या दुधाला मिळाला चक्क 98 रुपये दर; कुठे मिळाला हा दर? जाणून घ्या
पुढे ते म्हणाले की. “आम्ही तिसरी आघाडी म्हणून काम करत नाही. आम्ही कोणाच्या बाजूने नाही परंतु आम्ही लोकांना नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आमच्या कामाच्या पद्धतीमुळे अनेक पक्षांनी आमच्याशी आमच्याशी संपर्क साधला आहे,” असा दावा असे केसीआर यांनी केला आहे.