सध्या उन्हाळा (Summer) सुरु झाला आहे. उन्हाळा सुरु झाल्याने गर्मीपासून वाचण्यासाठी लोक एसी, कुलर, फॅन यांसारखी उपकरण खरेदी करत आहेत. आजकाल बऱ्याच लोकांचा कल हा एसी (Ac) खरेदी करण्याकडे वाढत आहे. एसीमुळे गर्मीपासून सुटका होते त्यामुळे बरेच लोक एसी खरेदी करत असतात. मात्र एसी खरेदी करण्याच्या आधी अनेक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नाहीतर थोड्याच दिवसात एसी खराब होऊ शकतो. त्यामुळे एसी खरेदी करण्याआधी या महत्वाच्या टिप्स जाणून घ्या.
शेताच्या बांधावर जाऊन रोहित पवारांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या!
१) एसीचा प्रकार –
एसीच्या प्रकाराबद्दल आधीच माहिती घेणे खूप गरजेचे असते. एसी हा विंडो किंवा स्प्लिट असतो. यामध्ये विंडो एसी हा स्वस्त आहेत मात्र हा एसी चालू केल्यावर याचा आवाज जास्त येतो. त्याचबरोबर स्प्लिट एसीबद्दल पहिले तर हे एसी दीर्घकाळ चालतात आणि त्यामध्ये चांगले डिझाइन देखील सहज उपलब्ध होतात.
शेतकरी कुटुंबातील मुलीची कमाल! अभ्यास सांभाळत करते 20 एकर शेती; कमावते मोठे आर्थिक उत्पन्न
२) टनेज
टनेज म्हणजे थोडक्यात एसीची कूलिंग क्षमता. त्यामुळे एसी खरेदी करताना आपल्या खोलीचा आकार किती आहे या गोष्टींचा विचार करून एसी खरेदी करावा. ते आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.
आदिल ड्रायव्हर असून तो झोपडपट्टीत राहतो, राखी सावंतने केला मोठा खुलासा
३) ब्लोअर फॅन व्ह्यू
एसीचा ब्लोअर फॅन जेवढा मोठा आणि मजबूत असेल तेवढाच त्याचा हवा प्रवाह वेगवान होईल. त्यामुळे एसी खरेदी करताना याची काळजी घेणे देखील आवश्यक आहे.
कमी मतदानावरुन संजय राऊत यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “पुणेकर घरी बसतील…”
४) कूलिंग आणि हीटिंगसह एसी
तुम्हाला जर उन्हाळ्यामध्ये आणि त्याचबरोबर इतर ऋतूमध्ये देखील एसीचा वापर करायचा असेल तर तुम्ही असा एसी घेऊ शकता ज्यामध्ये कूलिंग आणि हीटिंग फीचर आहे. यामुळे तुम्हाला वर्षभर एसीचा लाभ घेता येईल.
५) इन्व्हर्टर एसी
आता एसी घेणे म्हणजे खर्च देखील होतो. एसीसाठी वीजबिल देखील मोठ्या प्रमाणात येते. त्यामुळे जर इन्व्हर्टर एसी घेतला तर त्याला कमी वीज लागते.
धक्कादायक! कार्यक्रमात गौतमी पाटील कपडे बदलताना तिचा अश्लील व्हिडीओ व्हायरल; पोलिसात तक्रार दाखल