Site icon e लोकहित | Marathi News

राजगिरा भाजीच सेवन करताय? ‘हे’ आहेत महत्वाचे फायदे

Consuming amaranth vegetable only? 'These' are important benefits

आपल्या शरीराला पालेभाज्या आणि फळांमधून वेगवगळे आवश्यक व्हिटॅमिन मिळत असतात. दरम्यान राजगिरा (Amaranth) भाजीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, प्रथिने आणि खनिजे (vitamin)असतात. राजगिराच्या सेवनाने तुम्ही कोलेस्ट्रॉल, बीपी आणि वाढतं वजन सहज नियंत्रित करू शकता.इतर कोणत्या समस्यांपासून मुक्तता (Freedom from problems) मिळवण्यासाठी राजगिरा खाणं फायदेशीर ठरतं.

शरीरावर सुज येतेय? मग करा हे घरगुती उपाय, झटपट होईल सुज कमी

केसांसाठी फायदेशीर

राजगिरामध्ये लाइसिन आणि एमिनो अॅसिड आपल्या शरीराला मिळते. दरम्यान हे दोन्ही केस निरोगी ठेवण्यासाठी आणि केस गळण्याच्या समस्येवर परिणामकारक आहेत.

दातदुखीवर परिणामकारक

राजगिराच्या सेवनाने दातांच्या समस्या मुळापासून नष्ट होतात. आपल्याला होत असलेल्या दातदुखी, तसेच तोंडाच्या अल्सरपासून देखील मुक्ती मिळवू शकतो. राजगिरा पाण्यात उकळून स्वच्छ धुवा आणि नंतर गुळण्या करा यामुळे भरपूर अराम मिळेल.

काय सांगता? आता शेतमाल सुद्धा मिळणार ॲमेझॉनवर; ॲग्रिकल्चरल ट्रस्ट आणि ॲमेझॉनमध्ये सामंजस्य करार

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

जर तुम्ही वजन कमी करायचा प्रयत्न करत असल तर तुम्ही आपल्या आहारात राजगिरा अवश्य करा. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. राजगिरा आपल्या शरीरात अशे हार्मोन्स सोडते ज्यामुळे आपल्याला लवकर भूक लागत नाही.

मधुमेहींसाठी फायदेशीर

राजगिरामध्ये इंसुलिनची पातळी कमी करते आणि भूक नियंत्रणात ठेवते. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल तर राजगिरा खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

State Govt: राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा! पीक नुकसान भरपाईची रक्कम येणार थेट बँक खात्यात

डोळे निरोगी राहतात

डोळे निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्व अ आणि क ची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून राजगिरामध्ये अ जीवनसत्व मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे याचं सेवन करून तुम्ही तुमचे डोळे दीर्घकाळ निरोगी ठेवू शकता.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रभावी

राजगिरा बिया शरीरासाठी फायदेशीर असतात. यामध्ये भरपूर फायबर असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं. विशेष म्हणजे राजगिरामध्ये फायटोन्यूट्रिएंट्सचे प्रमाणही लक्षणीय असल्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो.

Lumpy: लम्पी आजाराने घातले थैमान! पाहा महाराष्ट्रातील सद्यस्थिती

त्वचेच्या समस्या दूर होतात

राजगिऱ्याचं सेवन केल्याने अनेक प्रकारच्या त्वचेच्या समस्यांवर गुणकारी असतात. त्वचेवर खाज झाल्यास राजगिरा बारीक करून त्या ठिकाणी लावल्यास हा त्रास लवकर बरा होतो. त्यामुळे राजगिराच सेवन करावे.

Spread the love
Exit mobile version