स्वस्तात मस्त! भारतातील बेस्ट बजेट स्मार्टफोन्सची यादी पाहा एका क्लिकवर

Cool for cheap! Check out the list of best budget smartphones in India in one click

सध्या भारतीय बाजारात दररोज नवनवीन स्मार्टफोन (Smartphone) लाँच केले जात आहेत. या स्मार्टफोन्सला मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. जर तुम्ही चांगला स्मार्टफोन खरेदी करायला गेला तर त्याची किंमत तुमच्या बजेट बाहेर असते. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना हे स्मार्टफोन खरेदी करता येत नाहीत. परंतु बाजारात असेही काही स्मार्टफोन आहेत जे तुम्ही अगदी तुमच्या बजेटमध्ये (Budget Smartphone) खरेदी करू शकाल, ज्यात कंपनीने शानदार फीचर्स दिले आहेत. (Latest Marathi News)

Tomato Price Hike | टोमॅटोमुळे लागली लॉटरी! दिवसाला चक्क 18 लाखांची कमाई

Samsung Galaxy M14 6GB RAM
किमतीचा विचार केला तर या स्मार्टफोनची (Samsung Galaxy M14) किंमत 15,490 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच लांबीच्या IPS LCD डिस्प्लेसह 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. यात 50MP + 2MP + 2MP कॅमेरा आणि ड्युअल एलईडी फ्लॅशसह 13MP फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.

Tecno Pova Neo 5G
15,490 रुपये किमतीचाच हा स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 6.8 इंच लांबीच्या IPS LCD डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट दिला असून तुमच्यासाठी यात 50MP + 0.08MP कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशसह 8MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Amruta Fadnavis । अमृता फडणवीस पुन्हा चर्चेत; ‘त्या’ फोटोंमुळे झाल्या ट्रोल

Tecno Spark 10 5G 256GB
या फोनमध्ये 6.6 इंच लांबीच्या IPS LCD डिस्प्लेसह 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. याची किंमत 15,000 रुपये इतकी आहे. ज्यात (Tecno Spark 10 5G) तुम्हाला 50MP + 0.08MP ड्युअल कॅमेरा आणि ड्युअल एलईडी फ्लॅशसह 8MP फ्रंट कॅमेरा मिळेल.

Realme Narzo 50 5G 128GB
किमतीचा विचार केला तर या फोनची (Realme Narzo 50 5G) किंमत 15,499 रुपये आहे. या फोनमध्ये 6.6 इंच लांबीच्या IPS LCD डिस्प्लेसह 90Hz रिफ्रेश रेट दिला असून 48MP + 2MP कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशसह 8MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

नाट्यमय घडामोडीनंतर खाते वाटप जाहीर! जाणून घ्या अजित पवार यांच्यासह कोणाला कोणते खाते मिळाले

Moto G62 5G
या फोनची किंमत 15,499 रुपये आहे. कंपनीच्या या 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच लांबीच्या IPS LCD डिस्प्लेसह 144Hz रिफ्रेश रेट दिला गेला आहे. यात 50MP + 8MP+ 2MP कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशसह 16MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Xiaomi Redmi Note 11T 5G
हा 5G फोन तुम्ही 15,499 रुपयांच्या किमतीत खरेदी करू शकता. या फोनमध्ये (Xiaomi Redmi Note 11T 5G) 6.6 इंच लांबीच्या IPS LCD डिस्प्लेसह 90Hz रिफ्रेश रेट दिला आहे. ज्यामध्ये 50MP + 2MP कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशसह 16MP फ्रंट कॅमेरा कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला आहे.

Samsung Galaxy M33 5G
कंपनीच्या या 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच लांबीच्या IPS LCD डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. या फोनची किंमत 15,660 रुपये आहे. ज्यात 50MP + 5MP+ 2MP +2MP कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशसह 8MP फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.

सर्वात मोठी बातमी! शरद पवारांच्या पत्नी शस्त्रक्रियेसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Realme 8 5g 64gb
रियलमीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंच लांबीच्या IPS LCD डिस्प्लेसह 90Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. जो तुम्ही 15,499 रुपये किमतीसह खरेदी करू शकता. कंपनीकडून यामध्ये 48MP + 2MP +2MP कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशसह 16MP फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे.

Lava Agni 5G
लावाच्या या फोनची किंमत 15,990 रुपये इतकी आहे. या फोनमध्ये 6.78 इंच लांबीच्या IPS LCD डिस्प्लेसह 90Hz रिफ्रेश रेट आहे. या फोनमध्ये 64MP + 5MP+ 2MP +2MP कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशसह तुम्हाला 16MP फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.

Vivo T2x 8GB RAM
किमतीचा विचार केला तर या फोनची किंमत 15,999 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.58 इंच लांबीच्या IPS LCD डिस्प्ले आणि 60Hz रिफ्रेश रेट दिला आहे. यात 50MP + 2MP कॅमेरा आणि एलईडी फ्लॅशसह 8MP फ्रंट कॅमेरा पाहायला मिळेल.

तुम्ही आता हे शानदार फीचर्स, दमदार प्रोसेसर असणारे स्मार्टफोन सहज खरेदी करू शकता. हे स्मार्टफोन तुमच्या बजेटमध्ये बसू शकतात. त्यामुळे तुम्हाला आता स्मार्टफोन खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत.

दोन दिवसानंतर मुलाचं लग्न, नाचताना गाठले मृत्यूने; क्षणात झाल होत्याचं नव्हतं, पाहा व्हायरल व्हिडिओ

Spread the love