Corona News । मोठी बातमी! महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण; धक्कादायक माहिती समोर

Corona News

Corona News । कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या जगभरात धुमाकूळ घातला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुन्हा मास्क लावावे लागणार का? त्याचबरोबर लॉकडाऊन देखील पुन्हा होणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. दिवसेंदिवस कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळल्यामुळे चिंता वाढली आहे.

Amruta Fadanvis । अमृता फडणीस यांनी हटके अंदाजात दिल्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा; पहा व्हिडिओ

छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या दोन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता अलर्ट झाली आहे. नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. सध्याचा नवीन व्हेरिएंट हा धोकादायक असल्याचे बोलले जात आहे.

Shrigonda Accident । नवीन वर्षी कुटुंबावर काळाचा घाला, कारचा भीषण अपघात; २ जणांचा जागीच मृत्यू तर ७ जण गंभीर जखमी

कोविड-19चा हा नवीन सब-व्हेरियंट रोगप्रतिकारक शक्तीला हुलकावणी देण्यात पटाईत आहे. त्याची लक्षणे ही आधीच्या कोविड सारखीच आहेत. यामध्ये ताप येणे, घसा खवखव, डोकेदुखी, सर्दी होणे, पोट दुखी आणि जुलाब या लक्षणांचा समावेश यामध्ये आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, JN.1 या नवीन सब-व्हेरियंटमुळे गॅस्ट्रोइंटेस्टीनल समस्या अधिक होऊ शकतात.

Ram Temple Threat । सर्वात मोठी बातमी! श्रीराम मंदिर आणि योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी; सर्वत्र उडाली मोठी खळबळ

Spread the love