Maharashtra Covid Update । महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचा धोका वाढला! मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

Corona threat increased in Maharashtra

Maharashtra Covid Update । मुंबई : कोरोनाने 2019 (Covid 19) साली संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला होता. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कित्येक महिने लॉकडाऊन (Lockdown In India) घातले होते. लॉकडाऊन (Lockdown) असल्याने अनेकांचे रोजगार गेले होते. लाखो लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला होता. अशातच आता राज्यासाठी चिंताजनक बाब आहे. कारण राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. (Latest Marathi News)

Pune News । पुणे हादरलं! भाजप युवा नेत्याची रेल्वेखाली उडी टाकून आत्महत्या, नेमकं कारण काय?

19 डिसेंबर रोजी कोरोनाची 11 नवीन रुग्ण आढळून आली आहे. सर्वात जास्त रूग्ण हे मुंबईतील (Corona patient in Mumbai) आहेत. या रूग्णांसह आतापर्यंत कोरोनाच्या रूग्णांची संख्या 35 वर गेली आहे. यापैकी मुंबईत 27 रुग्ण, पुण्यात 2 रुग्ण आणि कोल्हापुरात एक रुग्ण एक्टिव्ह आहे. त्याशिवाय होम आयसोलेशनमध्ये एकूण 23 रुग्ण असून एक रुग्ण रुग्णालयात आयसोलेशनमध्ये आहे. जर आता ही रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही तर अडचणी वाढू शकतात.(Covid Update)

Israel Hamas War Update । जीवन नरक बनले! इस्रायलच्या हल्ल्यात १७ दिवसांच्या मुलीचा गेला जीव

भारतात कोविड-19 चे सब-व्हेरियंट JN.1 केरळमध्ये सापडला आहे. यानंतर केंद्र सरकार (Central Govt) अलर्ट मोडमध्ये आहे. केंद्र सरकारने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतत पाळत ठेवण्यास सांगितली आहे. दरम्यान, आतापर्यंत महाराष्ट्र राज्यात कोरोनाचे एकूण 80,23,407 रूग्ण बरे झाले असून मंगळवारी एकही कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला नाही.

Pune Korean Blogger News । मोठी बातमी! लाइव्ह व्हिडिओमध्ये कोरियन ब्लॉगरचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक

Spread the love