
Corona Update । सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये चांगलीच वाढ होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन देखील अलर्ट झाले आहे. कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत नागरिकांना अनेक गंभीर समस्या समोर आल्या आहेत. कोरोनामुळे शारीरिक समस्या वाढू शकतात त्यासाठी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देखील तज्ञांकडून दिला जातोय.
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात शास्त्रज्ञांनी सांगितले की कोरोना आता आवाज देखील हिरावून घेऊ शकतो. कोविड-19 मुळे व्होकल कॉर्ड पॅरालिसीसची एक केस समोर आली आहे. (Latest News) माहितीनुसार, जर्नल पेडियाट्रिक्समधील एका संशोधनात असे आढळून आले आहे की, कोरोनामुळे फक्त चव आणि वासच नाही तर घशाचा आवाज देखील जाण्याची शक्यता आहे. याला व्होकल कॉर्ड पॅरालिसिस म्हणतात.
देशातील कोरोनाची स्थिती
गेल्या 24 तासांत भारतात कोविड-19 ची 752 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 3,420 वर पोहोचली आहे. 21 मे 2023 नंतर देशात एकाच दिवसात कोरोना विषाणू संसर्गाची नोंद झालेली ही सर्वाधिक संख्या आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत अपडेट केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण कोविड-19 रुग्णांची संख्या 4.50 कोटी (4,50,07,964) आहे.
Wedding Viral Video । लग्नात पनीर वरून व्हराडात तुफान हाणामारी; व्हिडीओ व्हायरल
मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोविड-19 मुळे गेल्या 24 तासांत केरळमध्ये दोन तर राजस्थान आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या 4,44,71,212 झाली आहे. राष्ट्रीय पुनर्प्राप्ती दर 98.81 टक्के आहे, तर मृत्यू दर 1.19 टक्के आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 विरोधी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.
Ajit Pawar । “आम्ही सांगू तेच खरं”, अजित दादांचा पुन्हा राष्ट्रवादीवर दावा