कापसाला ‘पांढरे सोने’ म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घेतले जाणाऱ्या नगदी पिकांमध्ये कापसाचा समावेश आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश मध्ये मोठ्या क्षेत्रात कापूस उत्पादन घेतले जाते. एकूण आकडेवारीनुसार राज्यात उत्पादित होणारा 80 टक्के कापूस हा विदर्भात उत्पादित होतो. मात्र सध्या कापसाला योग्य तो दर नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. यासाठी राज्यात ‘स्मार्ट कॉटन प्रकल्प’ ( Smart cotton Project) राबविला जाणार आहे. राज्यातील कापूस उत्पादक पट्ट्यातच हा प्रकल्प राबविला जाणार आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प अंतर्गत राज्यातील प्रमुख 12 कापूस उत्पादक जिल्ह्यातील 35 तालुक्यात लवकरच स्मार्ट कॉटन प्रकल्प राबवला जाणार आहे. कॉटन फेडरेशन आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. निर्यातक्षम दर्जाच्या कापूस उत्पादनासाठी एका गावातील शेतकऱ्यांनी एकाच वाणाची लागवड करावी. असे स्मार्ट कॉटन प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. यामुळे ‘एक गाव एक वाण’ ( One village one Brand) हे या प्रकल्पाचे ब्रीद वाक्य आहे.
खुशखबर ! महामार्गावरील टोल नाके आता बंद होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय
स्मार्ट कॉटन प्रकल्पाच्या माध्यमातून एकाच कापूस वाणाची लागवड केली जाईल. यानंतर उत्पादित झालेल्या कापसाचे गाठीत रूपांतर केले जाणार आहे. या तयार झालेल्या गाठींची ऑनलाईन पद्धतीने विक्री होणार आहेत. यामधून मिळणारा आर्थिक फायदा हा सहभागी शेतकऱ्यांना उत्पादनानुसार वर्ग केला जाणार आहे. परिणामी यामधील व्यापारी व दलाली यांच्या मक्तेदारीला आळा बसणार आहे.
महापुरुषांबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे आज श्रीगोंदा बंदची हाक