राज्यात नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. खरंतर कापसाला शेतकरी ‘पांढरे सोने’ असे म्हणतात. मात्र यंदाच्या वर्षी कापसाचे भाव ( Cotton Rates) गडगडले आहेत. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. यावर्षी विविध कापूस उत्पादक भागात मोठया प्रमाणात पाऊस पडला. यामुळे कापसाचे उत्पादन कमी झाले आहे. दरम्यान कापसाचे उत्पादन कमी होऊन सुद्धा दरात घसरण आहे. ( low cotton rates )
बऱ्याच शेतकऱ्यांनी कापसाचे भाव वाढतील या अपेक्षेने कापूस साठवून ठेवला होता. ( Preserved Cotton) मात्र मार्च ( March) मध्ये दरात थोडीशी तेजी आल्यानंतर शेतकऱ्यांनी कापूस विकायला काढला. तेव्हापासून कापसाची आवक मोठया प्रमाणात वाढली आणि कापसाचे दर ढासळले. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी कापसाची आवक पाच पटींनी वाढली आहे. याचा कापूस उत्पादकांना तोटा होत आहे
कापूस तयार होऊन सात महिने झाले तरी कापसाच्या भावात कसलीच तेजी नाही. सध्या बाजारात कापसाची आवक १ लाख १० हजार गाठींच्या दरम्यान आहे. मात्र मागच्या वर्षी याच महिन्यात ही आवक २० हजार गाठींपेक्षा कमी होती. यंदा कापसाची आवक पाच ते सहा पटींनी वाढली आहे. म्हणून कापसाचे दर मे मध्ये सुद्धा कमी आहे. अन्यथा मागील वर्षी मे महिन्यात कापसाचे दर तेजीत होते.
ब्रेकिंग! शॉपिंग मॉलमध्ये गोळीबार, 9 जणांचा जागीच मृत्यू तर 7 जण गंभीर जखमी
या महिन्यात कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार १०० रुपयांचा भाव मिळतोय. हा या हंगामातील सर्वात कमी भाव आहे. सध्या राज्यात अवकाळी पाऊस सुरू झालाय त्यामुळे कापूस साठवून ठेवण्यात सुद्धा शेतकऱ्यांना अडचण येत आहे. तसेच पुढच्या हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक भांडवल हवे आहे. मात्र कापसाच्या पडलेल्या दराने सगळीच गणिते फिस्कटवली आहेत.