मागील काही दिवसांपासून दिल्ली मेट्रो (Delhi Metro) चांगलीच चर्चेत येत आहे. सोशल मीडियावर (Social media) मेट्रोमधील अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. प्रसिद्धीसाठी काही लोक गिटार वाजवत असतात, तर काही लोक मेट्रोमध्ये अंघोळ करत असतात. मेट्रो प्रशासन प्रवाशांना यावरून अटकाव घालत असते. परंतु प्रवासी त्यांना जुमानत नाहीत. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत असून यावर आता चर्चा होऊ लागली आहे. (Latest Marathi News)
भाजपकडून बारामतीत पवारांना मोठा धक्का? राजकीय वातावरण तापले
ट्विटरवर (Twitter) व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये एक कपल किस करत आहेत. यावर काही वापरकर्ते मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत तर काही वापरकर्ते संताप व्यक्त करत आहेत. व्हायरल झालेल्या या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 17 जून रोजी हुडा सिटी सेंटरच्या दिशेने जात असणाऱ्या मेट्रोच्या yellow line वर T2C14 मध्ये ही घटना घडली आहे .
म्हसोबाच्या वाडी गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा योग दिन साजरा
या पोस्टची मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून त्यावर त्यांनी दोन दिवसांनंतर या पोस्टवर त्यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले, आम्ही गैरसोयीबद्दल खेद व्यक्त करतो. आम्ही या प्रकरणी चौकशी केली असून आम्हाला असे कोणतेही प्रवासी आढळले नाहीत. मेट्रोमध्ये सतत अशा घटना घडत असतात त्यामुळे या पोस्टनंतर मेट्रो प्रशासनावर टीका केली जात आहे.
ब्रेकिंग! पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये येत्या 48 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता