Maratha reservation । मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी (Maratha reservation strike) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मागील काही दिवसांपासून आंदोलन करत आहेत. राज्य सरकराने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले आहे. पण त्याविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी उच्च न्यायालयात (High Courts) धाव घेत याचिका दाखल केली आहे. यावर आता न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
Emraan Hashmi । इमरान हाश्मीने केला सर्वात धक्कादायक खुलासा
दरम्यान, सरकारच्या निर्णयानंतर १० टक्के आरक्षण हे पोलीस भरती, शिक्षक भरती आणि वैद्यकीय प्रवेशाला लागू केले. यावर आता न्यायालयाने सुनावणीदरम्यान, कोणतीही भरती ही न्यायालयाच्या आदेशाच्या आधीन राहील, असे आदेश दिले आहेत. तसेच पुढील सुनावणी मंगळवारी १२ मार्च रोजी पार पडणार आहे. या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान मराठा आरक्षणानुसार कोणतीही भरती किंवा शैक्षणिक दाखले दिल्यास त्याबाबतचा निर्णय न्यायालयाच्या निर्णयावर अंवलबून असणार आहे, हे लक्षात ठेवा असे सरकारला बजावले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Supriya Sule । घरगुती गॅस सिलेंडरची किंमत कमी होताच सुप्रिया सुळे कडाडल्या; केले सर्वात मोठे वक्तव्य