मुंबई : गिरगाव न्यायालयाने महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू (Bachhu kadu) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे. बच्चू कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट (Non-bailable warrant) जारी झाल्यानंतर ते आज न्यायालयात हजर झाले होते. बच्चू कडू यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने (Court) बच्चू कडू यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. 2016 मध्ये झालेल्या एका आंदोलनादरम्यान सरकारी कामांत अडथळा आणल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे.
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! लम्पी रोगावर स्वदेशी लस विकसीत होणार
काय आहे प्रकरण ?
30 मार्च 2016 रोजी अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी का राजकीय आंदोलनादरम्यान सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. तसेच शिवीगाळ करून भाऊराव गावित यांना मारहाण केल्याचा आरोप बच्चू कडू यांच्यावर करण्यात आला होता. या घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले होते. यानंतर मंत्रालयातील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मुख्य ठिय्या आंदोलनही केले होते. दरम्यान बच्चू कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालयात काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा सरकारी अधिकारी संघटनेने दिला होता.
दरम्यान आमदार बच्चू कडू यांनी आपण संबंधित अधिकाऱ्यास मारहाण केली नसल्याचा दावा केला होता. मात्र, याबत सरकारी अधिकारी संघटनेनं आक्रमक भूमिका घेतली आणि त्यामुळे मरीन लाईन पोलीस ठाण्यात बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान याप्रकरणी न्यायालयाने अलीकडेच बच्चू कडू यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले असून आज न्यायालयात बच्चू कडू हजर झाले. त्यांनी जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावत त्यांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.
भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदाच्या ५००८ जागांची होणार भरती, असा करा अर्ज