Rashmi Barve । जात प्रमाणपत्र अवैध असल्याने रामटेकच्या काँग्रेस (Congress) उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला होता. अशातच आता याच कारणामुळं त्यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द झाला आहे. रश्मी बर्वे यांना सर्वात मोठा दुसरा झटका बसला आहे. विशेष म्हणजे रश्मी बर्वे यांनी जितका काळ घालवला त्या काळातील त्यांच्यावर झालेला सरकारी खर्च वसूल केला जाईल. (Latest marathi news)
Navneet Rana । नवनीत राणांचे भवितव्य धोक्यात? जात वैधता प्रमाणपत्रावर आज होणार सुनावणी
जात वैधता प्रमाणपत्र रद्द केल्यानंतर रश्मी बर्वेंनी कोर्टात धाव घेतली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निकाल देत याप्रकरणी अंतरिम स्थगितीने दिली आहे. निवडणुकीच्या तोंडावर रश्मी बर्वेंना सर्वात मोठा धक्का बसला आहे. त्याशिवाय रश्मी बर्वे यांचा रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार म्हणून दाखल केलेला अर्ज रद्द केल्याप्रकरणी कोर्टाने कोणताही दिलासा दिला नाही.
Supreme Court । ‘आदेशाची पायमल्ली केल्यास…’, सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला दिला इशारा
याप्रकरणी आता नागपूर खंडपीठात पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत. पक्षातील अनेक बड्या नेत्यांनी महायुतीत प्रवेश केला आहे. याचा फटका साहजिकच आगामी निवडणुकीवर होऊ शकतो. अशातच आता पुन्हा एकदा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे.
Congress । बिग ब्रेकिंग! लोकसभेअगोदरच काँग्रेसला मोठा धक्का, पक्षाच्या प्रवक्त्याने दिला राजीनामा