Covid-19 Treatment । कोरोनाने जगभर थैमान घातले होते. यावेळी अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर काही लोकांनी कोरोनावर मात केली. मात्र काही लोकांना कोरोनामध्ये आपले प्राण गमवावे लागले यामध्येच आता थायलंड मधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. एका लहान बाळाला कोरोना व्हायरसची लागण झाली आणि त्यानंतर त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान काही भलतच घडलं. त्या बाळाच्या डोळ्यांचा रंग बदलल्याचं लक्षात आलं याला तज्ञांनी मेडिकल साईड इफेक्ट असे देखील म्हटला आहे.
खरीप हंगाम जून 2022 च्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे तहसीलदार यांना निवेदन
ही घटना थायलंड मधील असून एका सहा महिन्याच्या बाळाला एक दिवस ताप आणि खोकला आला होता. त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. नंतर त्याच्यावर उपचार सुरू केले असून बाळाला तीन दिवसांसाठी फेविपिराविर औषध दिले त्यानंतर बाळाची प्रकृती सुधारली आणि कोरोनाचे लक्षणे कमी झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र नंतर बाळाच्या आईच्या लक्षात आलं की त्याच्या डोळ्याचा रंग बदलला आहे.
Eknath Shinde । एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत केली मोठी घोषणा; आता कुणबी प्रमाणपत्र…
उपचाराच्या आधी या बाळाचे डोळे राखाडी होते मात्र उपचार झाल्यानंतर त्याचे डोळे निळे दिसू लागले होते. याबाबत त्या आईने लगेच डॉक्टरांना माहिती दिली. यानंतर डॉक्टरांनी लगेचच उपचार थांबवले. यानंतर बाळाच्या डोळ्याचा मुळ रंग पुन्हा दिसू लागला. मात्र ही घटना घडल्या घडल्या सर्वांना तर आश्चर्याचा धक्का बसला होता.
Uorfi Javed । धक्कादायक! निर्मात्याने फाडले उर्फी जावेदचे कपडे, जबरदस्ती करत…