Covid19 Sub Variant । कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगाचं वाढलं टेन्शन! दोघांचा मृत्यू

Covid19 Sub Variant

Covid19 Sub Variant । 2019 मध्ये कोरोना (Covid19) या विषाणूने संपूर्ण जगभरात चांगलेच थैमान घातले होते. अनेकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच देशात लॉकडाऊन घातले होते. काही दिवसांनी हा आजार आटोक्यात आला, परंतु आता पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढलं आहे. कारण आता कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. (Covid19 Sub Variant-Jn1 in Kerala)

Kamalnath । मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांना मोठा फटका! काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरुन डच्चू

यात एकाचा मृत्यू झाला आहे. केरळमध्ये कोरोनाचे सब-व्हेरियंट JN.1 (Covid19 Sub Variant-Jn1) आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा विषाणू वेगाने पसरतो. आरोग्य विभाग सतर्क झाला असून राज्यात अलर्ट जारी केला आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, भारतातील सध्या कोविड-19 रुग्णांपैकी 90 टक्क्यांपेक्षा जास्त रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळूली असून होम आयसोलेशनमध्ये आहेत. (Latest Marathi News)

Pune Accident News । ट्रक आणि कारचा पुण्यात भीषण अपघात! दोन जणांचा जागीच मृत्यू तर दोन वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी

दोघांचा मृत्यू

दरम्यान, केरळमध्ये एका व्यक्तीची आणि महिलेचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे या परिसरात आता कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या आहेत. आमदार केपी मोहनन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.

Bjp । आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! भाजप नेत्याची गोळ्या झाडून करण्यात आली हत्या

मागील काही आठवड्यांपासून केरळ राज्यात कोविड-19 च्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चाचणीसाठी पाठवण्यात आलेल्या इन्फ्लूएंझा सारख्या आजारांच्या प्रकरणांमधील नमुन्यांच्या संख्येत वाढ होत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात JN.1 व्हेरियंटचा इतर कोणताही दुसरा रुग्ण आढळून आला नाही.

Accident News । भीषण अपघात! ट्रकचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट चहा टपरीवर आदळली; ३ जणांचा जागीच मृत्यू

Spread the love