नागपुर: लम्पी आजारानं (Lumpy disease) संपूर्ण देशात तर धुमाकूळ घातलाच आहे. पण महाराष्ट्र (maharashtra) राज्यातील 30 जिल्ह्यात या लम्पी आजाराचा शिरकाव झाल्याची माहिती राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली. लम्पी आजारावर मात करण्यासाठी जनावरांना लसीकरणासह (vaccination) क्वारंटाईनही करण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे जनावरांमध्ये पसरलेल्या लम्पी त्वचा रोगावर गोमूत्र (cow urine) आणि इतर आयुर्वेदिक उपचार परिणामकारक ठरत असल्याची माहिती समोर आली आहे.
Satara: प्री-वेडींग शूट करायचय? मग आता सातारा बनतंय प्री-वेडींग डेस्टीनेशनचे माहेरघर
नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील देवलापार येथील गौ विज्ञान अनुसंधान केंद्राच्या वैद्यांनी एक दावा केला आहे. या दाव्यानुसार
गौमूत्रवर आधारलेल्या पद्धतीने त्यांच्या गौशाळेतील सुमारे 850 गौवंशीय प्राणी लम्पी मुक्त आहेत. महत्वाची बाब म्हणजे आत्तापर्यंत नेहमी गोमूत्र आणि शेण याच्या आयुर्वेदीय फायद्या विषयी सकारात्मक चर्चा ऐवजी नेहमीच नकारात्मक दृष्टीने राजकीय आरोप प्रत्यारोपच झाले आहेत. मात्र, आता तेच गोमूत्र लम्पी रोगाशी लढण्यामध्ये मदतगार ठरणार आहे.
Ajit Pawar: अजित दादा फडणवीसांकडून घेणार हे ट्रेनिंग?, केली मिष्किल टिप्पणी
देवलापार गौ विज्ञान अनुसंधान केंद्राच्या प्रधान वैद्य डॉ नंदिनी भोजराज (Physician Dr. Nandini Bhojraj) गोमूत्रपासून लम्पी त्वचारोग पूर्णपणे नष्ट करू शकतो अस मत व्यक्त केले आहे. डॉ नंदिनी यांच्या मते स्वस्थ देशी गायीचा गोमूत्र उकळून थंड करून लम्पी सदृश्य लक्षण असलेल्या प्राण्यांना प्यायला द्यावे. दरम्यान यानंतर त्या जनावरांची तर रोगप्रतिकारक क्षमता वाढून ते लम्पी मुक्त होऊ शकतात. तसेच ज्या प्राण्यांना अद्याप लंपीचा प्रादुर्भाव झालेला नाही त्या जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून ते लम्पी रोगाशी लढा देऊ शकतात.
हातावर सूज आलीय? मग ‘या’ उपायांनी मिळेल आराम
गौवंशीय प्राण्यांना असे द्यावे गोमूत्र –
1) एक वर्षापेक्षा मोठ्या प्राण्यांना 100 मिलीलिटर गोमूत्र उकळून द्यावे.
2) तसेच एका वर्षापेक्षा मोठ्या वासराला 50 मिलीलिटर गोमूत्र उकळून द्यावे.
3) सोबतच कडुलिंब – अढुळसा- गुळवेल – हळद – आजण (अर्जुन) या सर्वांचा अर्धा किलोचा पाला गौवंशीय प्राण्यांना खायला द्यावा..
4) गोवंशी प्राण्यांच्या गोठ्यामध्ये रोज संध्याकाळी धुरणी करावी.
शेतकऱ्यांसमोर नव संकट! ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर पडला खतांचा तुटवडा
वैद्य डॉ नंदिनी भोजराज यांनी दावा केला आहे की, याच पद्धतीने गोशाळेतील गोवंशीय प्राण्यांना 2018-19 मध्ये झालेल्या लम्पीच्या प्रादुर्भावापासून वाचवले होते. दरम्यान यावर्षीही देवलापार येथील गो शाळेतील साडेआठशे गोवंशीय प्राणी पूर्णपणे स्वस्थ आहे. महत्वाची बाब म्हणजे नक्कीच शेतकऱ्यांना लम्पी त्वचा रोगासंदर्भातील योग्य प्रशिक्षण देऊन शेतकऱ्यांच्या पशुधन वाचवण्यासाठीची मोहीम शासनानेच हाती घेणे आवश्यक आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा शेतकऱ्यांना दिलासा, वटाण्याला तब्बल 15 हजारांचा मिळाला कमाल भाव
सध्या लम्पी या रोगामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. शासनाने संक्रमित प्राण्यांच्या विलगीकरणाची मोहीम हाती घेतली असून ज्या भागात लम्पी संक्रमण झालेली जनावरे आढळत आहे त्याच्या पाच किलोमीटरच्या परिसरात लसीकरणाची मोहीम शासनाने हाती घेतली आहे.