शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी पशुपालन व दुग्धव्यवसाय करतात. हा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आता चांगले दिवस आले आहेत. मागील काही दिवसांत दुधाच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. दरम्यान आता पुणे जिल्हा दूध उत्पादन संघाने गायीच्या दुधाच्या खरेदी आणि विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागराज मंजुळेंनी सांगितला पहिल्या मजेशीर किस्सा, म्हणाले…
या पार्श्वभूमीवर गायीच्या दुधाच्या ( Cow Milk) खरेदी आणि विक्रीत प्रति लिटर दोन रुपये वाढ करण्यात येणार आहे. इंधनदरात झालेली वाढ आणि पशुखाद्यांचे वाढलेले दर यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक ताण आला आहे. म्हणून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने दूध संघाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
‘या’ अख्ख्या शाळेत फक्त एक शिक्षक आणि एक विद्यार्थी, तरीही रोज भरते शाळा
एवढंच नाही तर म्हशीच्या खरेदीदरात वाढ न करता विक्रीदरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आजपासून (दि.1) ही दरवाढ करण्यात आली आहे. शेतकर्यांना वाढीव दर देताना दूध संघाने ग्राहकांवर दूध दरवाढीचा बोजा टाकला आहे. ( Raise in Milk rate) दूध डेअऱ्यांकडे दूध संकलन वाढल्याने संघाचे दूध संकलन घटू लागले आहे. यामुळे दूध संघाने हा निर्णय घेतला आहे.
व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी ‘ही’ आहेत सर्वात बेस्ट ठिकाणे