
रितेश व जेनेलिया यांच्या वेड ( Ved) या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः ‘वेड’ लावले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेशने ( Ritesh Deshmukh) पहिल्यांदाच दिग्दर्शन केले आहे, तर अभिनेत्री जेनेलिया डिसूझा ( Genelia) हिने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. 30 डिसेंबर ला हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमावाला आहे.
धक्कादायक! ऑनलाईन गेम खेळताना तरुणाची ३२ लाखांची फसवणूक
चित्रपट प्रदर्शित होऊन 10 दिवस होऊन गेले असले तरी प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाचे ‘वेड’ अजूनही कायम आहे. सर्व चित्रपटगृहांमध्ये वेडचे शो हाऊसफुल होत आहेत. वेड मधील अजय- अतुल च्या गाण्यांनी तर प्रेक्षकांना वेडे केले आहे. मुंबई फिल्म कंपनीने ( Mumbai Film Company) वेडच्या ९ व्या दिवशीचे प्रसिध्द केले आहेत. वेडने पहिल्या आठवड्यातच 15 कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला होता.
नाद करा पण आमचा कुठं! शेतकरी घालतोय हार्ले डेव्हिडसनवर दूध
चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने 2.25 कोटींचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर सलग आठ दिवस अनुक्रमे 3.25 कोटी, 4.50 कोटी, 3.02 कोटी, 2.65 कोटी, 2.55 कोटी, 2.45 कोटी, 2.55 कोटी 5 कोटी अशी कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने तब्बल 27 कोटींचा टप्पा पार केला आहे. यामुळे रितेश व जेनेलिया देशमुख यांनी सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहे.
‘या’ गावातील लोक कपडे न घालताच राहतात; 85 वर्षांपासून आहे परंपरा!