रितेश व जेनेलिया यांच्या वेड ( Ved) या चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरशः ‘वेड’ लावले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेशने ( Ritesh Deshmukh) पहिल्यांदाच दिग्दर्शन केले आहे, तर अभिनेत्री जेनेलिया डिसूझा ( Genelia) हिने मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले आहे. 30 डिसेंबर ला हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमावाला आहे.
मोठी बातमी! आमदार बच्चू कडू यांचा अपघात
वेड या चित्रपटाने सगळ्यांना चांगलीच भूरळ घातली आहे. आता राज ठाकरे यांच्या पत्नीला वेड हा चित्रपट पाहायचा होता. त्यासाठी त्यांनी अख्ख चित्रपटगृहच बूक केल्याची माहिती समोर आली आहे. रितेश व जेनेलिया या दोघांनी ठाकरे कुटुंबासोबत हा चित्रपट पाहिला.
दिल्लीमधील महिलेवर पुण्यात बलात्कार; उपचार करण्यासाठी आली होती परंतु…
दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होऊन 10 दिवस होऊन गेले असले तरी प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाचे ‘वेड’ अजूनही कायम आहे. सर्व चित्रपटगृहांमध्ये वेडचे शो हाऊसफुल होत आहेत. वेड मधील अजय- अतुल च्या गाण्यांनी तर प्रेक्षकांना वेडे केले आहे. मुंबई फिल्म कंपनीने ( Mumbai Film Company) वेडच्या ९ व्या दिवशीचे प्रसिध्द केले आहेत. वेडने पहिल्या आठवड्यातच 15 कोटींच्या कमाईचा टप्पा पार केला होता.
ब्रेकिंग! राष्ट्रवादी आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची धाड