सध्या तरुण तरुणी इंस्टाग्रामचा (Instagram) वापर जास्त प्रमाणात करताना दिसून येत आहेत. इंस्टाग्रावर रिल्स बनविण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. एवढंच नाही तर आपल्या रिल्सला जास्त लाईक येण्यासाठी फॉलोवर्स जास्त वाढण्यासाठी तरुण वर्ग काहीही कृत्य करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आता एका तरुणाला इंस्टाग्रामवर रील बनविणे चांगलेच महागात पडले आहे.
चीनमध्ये चक्क नोटांचा पाऊस; पैसे पकडण्यासाठी लोकांची धक्काबुक्की
नाशिकमधील (Nahik) एका तरुणाला तलवार हातात घेऊन रील बविणे चांगलेच महागात पडले आहेत. याबाबत थेट नाशिकच्या गुन्हे शाखेने याची दखल घेली आहे. रिल्स बनवून पोस्ट केल्यानंतर त्याचे परिणाम त्या तरुणाला चांगलेच भोगावे लागले आहेत.
आजच्या दिवसासाठी खास ऑफर; रितेश-जिनिलीयाचा ‘वेड’ चित्रपट पाहा फक्त ९९ रुपयांत
झालं असं की, एका गाण्यावर तरुणाने हातात धारदार तलवार घेऊन रिल्स बनवली आणि तो रिल्स नाशिकच्या गुन्हे शाखेच्या निरीक्षणात आली. नंतर पोलिसांनी या तरुणाचा तपास सुरु आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे असलेली तलवार देखील पोलिसांनी जप्त करून घेतली आहे. आता या तरुणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशद माजविण्याचा प्रयत्न केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राखी सावंतने सुटकेनंतर दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाली, “मला चक्कर येतय, माझा बीपी देखील…”