Cricketer Death News । क्रिकेट खेळत असताना दुखापती होणे काही आपल्यासाठी नवीन नाही. क्रिकेट खेळताना चेंडू लागुन तर कधी डाईव्ह मारत असताना दुखापत या होतच असतात. मात्र बऱ्याचदा ही दुखापत एवढी गंभीर असते की, त्या खेळाडूला प्राण देखील गमावावे लागतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत. ज्यामध्ये खेळाडूंनी क्रिकेट मैदानावरच आपले प्राण गमावले आहेत. दरम्यान सध्या देखील अशा तीन घटना घडल्या आहेत ज्या ठिकाणी क्रिकेटपटूला क्रिकेट खेळताना आपले प्राण गमवावे लागले आहेत. (Cricketer Death News)
Aditya Thackeray । दुचाकीची धडक, अपघातग्रस्त तरुणांच्या मदतीला धावले आदित्य ठाकरे
मुंबईच्या मैदानावर एकाचवेळी अनेक सामने खेळले जातात. खेपट्ट्या जवळ असल्याने चेंडू लागण्याची देखील भीती असते. यामध्येच आता मुंबई येथील माटुंगाच्या मैदानावर 52 वर्षे क्रिकेटपटूचा चेंडू लागल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये 52 वर्षीय व्यक्तीला आपल्या संघाकडून क्षेत्ररक्षण करत असताना दुसऱ्या खेळपट्टीवरील फलंदाजाचा चेंडू लागला आणि यानंतर त्याचा मृत्यू झाला.
दुसरी घटना नोएडा या ठिकाणी घडली आहे. या ठिकाणी 32 वर्षीय क्रिकेटरला क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराचा झटका आला आणि यामध्ये त्याला प्राण गमवावे लागले आहे. हा क्रिकेटर दिल्लीतील रोहिणी या ठिकाणी राहत होता या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Viral Video । चोरीचा आरोप, बॉईज हॉस्टेलमध्ये दोन मित्रांमध्ये तुफान हाणामारी; पाहा Video
त्याचबरोबर तिसरी घटनाही सिन्नर या ठिकाणी घडली आहे. या ठिकाणी 29 वर्षीय तरुण क्रिकेट खेळत होता यावेळी त्याच्या छातीत अचानक कळ आली आणि त्याचा मृत्यू झाला. छातीत दुखायला लागल्यानंतर त्याला त्याच्या मित्रांनी तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र रुग्णालयामध्ये जाण्याआधी त्याचा मृत्यू झाला होता.
Pune News । पुण्यात ऑनड्युटी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासोबत घडलं भयानक; मेंदूत रक्तस्त्राव होऊन…