दिल्लीमध्ये (Delhi) एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण देश अगदी हादरून गेला आहे. दिल्लीमध्ये एका २० वर्षीय तरुणाने अवघ्या १६ वर्षीय मुलीची निर्दयीपणे हत्या (Murder) केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या हत्याकांडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Marriage | इथं एकीचेच असतात वांदे! पण ‘हा’ गडी संभाळतो ९ बायका
काल (ता.२९) रात्री साडेआठच्या सुमारास साहिल नावाच्या आरोपीने एका अल्पवयीन मुलीला चाकूने भोसकले. त्यानंतर इथंच न थांबता खाली पडलेल्या मुलीला भल्यामोठ्या दगडाने ठेचले. साहिल हे सर्व करत असताना, आजूबाजूला भरपूर लोकं जमले होते. मात्र या सर्व लोकांनी फक्त बघ्यांची भूमिका स्वीकारली.
IPL 2023 Winner | आयपीएलचा अंतिम सामना पार पडला! चेन्नई सुपर किंग्जकडे पाचव्यांदा विजेतेपद…
त्यांच्यातील एकहीजण त्या मुलीच्या बचावासाठी पुढे आले नाही. आरोपी साहिलची त्या अल्पवयीन मुलीशी ओळख होती. तसेच त्याचे त्या मुलीशी प्रेमसंबंध होते, रविवारी त्या दोघांमध्ये भांडण झाले. यामुळे ती मुलगी रात्री मित्राच्या घरी जात असताना साहिलने तिचा खून केला.
९० सेकंदांपर्यंत साहिलने या मुलीवर हल्ला केला. त्यानंतर तो पसार झाला. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधून त्याला अटक करण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे मुलीची खोपडी सुद्धा फुटली होती, असे पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे.