
लग्नसमारंभ ( Marriage) म्हणजे प्रचंड गडबड आणि गोंधळ असतो. विविध लग्नात कार्यक्रमांची रेलचेल, पाहुण्यांची गर्दी आणि गोंधळ सुरू असताना बऱ्याचदा वादाचे प्रकार सुद्धा घडतात. दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे लग्नाच्या कार्यक्रमात एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी हळदीच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचत ( Dance on DJ) असताना धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाले. दरम्यान वाद सोडवायला गेलेल्या तरुणाच्या पोटात चाकूने ( Knief) भोसकले असल्याचा प्रकार येथे घडला आहे.
विकास जनार्दन भडके असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवारी (ता.७) विकास आपल्या मित्राच्या हळदीसाठी पोलीस कॉलनीमध्ये गेला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचा भाऊ आकाश भडके व इतर मित्र होते. हळदीच्या कार्यक्रमात डीजेच्या तालावर नाचत असताना विकासाचा भाऊ आकाश याचा धक्का सूरज भुजबळ या तरुणाला लागला. यावरून त्या दोघांत वाद सुरू झाले.
ब्रेकिंग! अवघ्या काही तासातच होणार महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा फैसला… संपूर्ण राज्याच लक्ष
यावेळी विकास सुरजला समजवण्यासाठी पुढे गेला मात्र सुरजने काहीच न ऐकता “मी तुला जिवंत सोडणार नाही”, असे म्हणत विकासाच्या पोटात चाकू घुपसला. दरम्यान जखमी विकासला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेत विकास गंभीर जखमी झाला असून त्याला घाटीच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
पुणे लोकसभा पोटनिवडणूकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला! ‘या’ नेत्याला मिळणार संधी…