Pune Crime । धक्कादायक! समोस्यांत कोंबले तंबाखू, गुटखा, कंडोमसह दगड, पोलीस तपासात हादरवणारी बाब आली समोर

Pune Crime

Pune Crime । पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. पोलिसांसमोर देखील वाढत्या गुन्हेगारीला (Crime) आळा घालणे आव्हान बनले आहे. शुल्लक गोष्टींमुळे गुन्हे होत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एक जणाला अटक केली आहे. (Pune Crime News)

Crime News । भांडण मिटवण्यासाठी दोघांनी केले दारू पार्टीचे आयोजन, मात्र पुढे जे घडले ते वाचून तुम्हालाही बसेल धक्का

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये हा प्रकार घडला असून येथे ऑटोमोबाईल फर्मच्या कँटीनमध्ये खाद्यपदार्थांचा पुरवठा केला जातो. या फर्मकडून दुसऱ्या एका कंत्राटदाराला कँटिनला समोसा पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले होते. (Crime News) शनिवारी ऑटो फर्मच्या काही कर्मचाऱ्यांनी समोस्यामध्ये गुटखा आणि दगड मिळाल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली. (Latest marathi news)

Maharashtra Politics । तटकरेंनी फोडले शरद पवारांचे घर, आव्हाडांच्या आरोपावर अजित पवार गटाचे प्रत्युत्तर

कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांवर संशय व्यक्त केला. तपासादरम्यान, त्यांनीच समोस्यात कंडोम, गुटखा आणि दगड भरल्याची माहिती समोर आली. कंत्राट रद्द केल्याच्या रागातून हा धक्कादायक प्रकार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Supriya Sule । बारामतीत नागरिकांना धमकावलं जातंय! सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप

Spread the love