Crime News । हृदय पिळवून टाकणारी घटना! 14 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, दगडाने चेहरा ठेचला अन्…

Crime

Crime News । सध्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अल्पवयीन मुले, तरुण मुले गुन्हेगारी करत असल्याचे आपल्याला दिसत आहे. अल्पवयीन मुलांकडून देखील मोठे मोठे गुन्हे घडतच आहेत. यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस देखील कठोर पाऊले उचलत आहेत. मात्र तरी देखील गुन्हे हे घडतच आहेत. सध्या देखील लातूरच्या उदगीर मधून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे.

Milind Deora । बिग ब्रेकिंग! निवडणुकांपूर्वीच काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; बड्या नेत्याने दिला राजीनामा

लातूरमधील उदगीर या ठिकाणी एका 14 वर्षाच्या शाळकरी मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. काही नराधमांनी त्याचा चेहरा दगडाने ठेचून पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे तेथील परिसर हादरून गेला आहे. याप्रकरणी आता उदगीर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shrikant Shinde । खासदार श्रीकांत शिंदे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत मोठे वक्तव्य

याबाबत अधिकची माहिती अशी की, 14 वर्षीय मुलगा घरातून बाहेर गेला. त्यानंतर तो परतलाच नाही. तो 10 जानेवारी रोजी घरातून बाहेर गेला यानंतर 13 जानेवारी रोजी शेत शिवारात या मुलाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. यानंतर आपल्या मुलाला पाहून त्याच्या कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे.

Ajit Pawar । “…अशा लोकांना ओवाळून टाकले पाहिजे”, अजित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

आता या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस यंत्रणा करत आहे. नेमकी या मुलाची हत्या का करण्यात आली? याचा तपास देखील पोलीस करत आहेत. याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही.

Pandharpur News । धक्कादायक! दोन सख्ख्या भावांसह तीन शाळकरी मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू; कुटुंबावर मोठी शोककळा

Spread the love