Crime News | मुंबई-देवगिरी एक्सप्रेसमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वेच्या टॉयलेटमध्ये एक-दीड महिन्यांची मुलगी झोपलेली आढळल्याने संपूर्ण प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. देवगिरी एक्सप्रेसने औरंगाबाद स्थानक सोडल्यानंतर बाथरूममधून मुलीच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर प्रवाशांनी चौकशी केली. यामुळे बाळ एका कमोडच्या शेजारी झोपलेले सापडले. हा प्रकार उघडल्यावर सर्व प्रवाशांना धक्का बसला.
Hyundai । ह्युंदाईची ‘ही’ कार खरेदी करताल तर मिळेल 50 हजार रुपयापर्यंत सूट! वाचा संपूर्ण माहिती
मनमाड पोलिसांनी अज्ञात पालकांविरोधात तक्रार दाखल केली आहे आणि बाळाला बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे देशभरात नवजात बाळांची अशी दुर्दशा करणाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. पालकांच्या निष्ठुरतेचा कळस असलेल्या या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Baramati News । बारामतीच्या राजकारणातून समोर आली सर्वात मोठी बातमी!
या घटनेने रेल्वे प्रवाशांमध्ये असंतोष आणि चिंता व्यक्त केली आहे, कारण बाळाची अशी वाईट स्थिती अनेक प्रश्न निर्माण करते. पालकांच्या अशा कृत्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच, समाजाच्या पातळीवर अशा घटना थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना आणि जनजागृतीची गरज असल्याचे बोलले जात आहे.