Crime News । महाराष्ट्रातील संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जातीबाहेर लग्न केल्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांनी आपल्याच जावयाची निर्घृण हत्या केली. 22 वर्षीय अमित साळुंखे याचा त्याच्याच घरात चाकू आणि तलवारीने वार करून खून करण्यात आला. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
अमित आपल्या घरात आरामात PUBG चा गेम खेळत होता, त्याच दरम्यान त्याच्या पत्नीच्या कुटुंबातील त्याचा भाऊ आणि सासरे त्याच्या घराबाहेर आले. कोणत्या तरी बहाण्याने अमितला घराबाहेर बोलावून त्याच्यावर चाकू आणि तलवारीने अमानुष हल्ला करण्यात आला. या संपूर्ण वेळेत अमितचा ओरडण्याचा आवाज PUBG गेममध्ये रेकॉर्ड झाला.
Eknath Shinde | ब्रेकिंग! एकनाथ शिंदेंनी महिलांना दिली आणखी एक भेट; ही गोष्ट मिळणारं आता मोफत
हत्येनंतर दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, डीसीपीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 14 जुलै रोजी मुलीच्या कुटुंबीयांनी मृतावर चाकू आणि तलवारीने हल्ला केला होता. यादरम्यान तो गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात दोन आरोपी असून, त्यांच्या शोधासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. आंतरजातीय विवाहामुळे अमितचा खून झाला आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.
Pune News | पुण्यात पावसाचा हाहाकार, एकाच दिवसात चार जणांचा मृत्यू