
Crime News । सध्या अनेकजण सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. सोशल मीडियामध्ये इंस्टाग्राम तर सर्वात जास्त वापरले जात आहे. अनेक तरुण-तरुणी मनोरंजनाचे साधन म्हणून इंस्टाग्राम वापरत आहेत. मात्र आता हे फक्त मनोरंजनाचे साधन नाही राहिलं तर अनेक लोक अनोळखी लोकांशी देखील या ॲपच्या माध्यमातून बोलत आहेत. मात्र लोकांशी मैत्री करण देखील चांगलेच अंगलट येऊ शकतं. सध्या देखील इंस्टाग्रामवरून ओळख झालेल्या तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai News )
यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सदरच्या आरोपीने महिलेकडून पैसे उकळल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे. त्याचबरोबर या आरोपीचे इतर महिलांशी देखील संबंध असून त्याने महिलांना लग्नाचं आमिष दाखवून फसवल्याची माहिती समोर आली आहे. योगेश सुनील भानुशाली असे या आरोपीचे नाव आहे. सध्या या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी व्यवसायाने डॉक्टर असून त्याच्या विरोधात आतापर्यंत बलात्काराचे तीन गुन्हे दाखल आहेत.
हा आरोपी इंस्टाग्राम वरून तरुणींशी मैत्री करायचा त्यानंतर तो लग्नाचं आमिष दाखवायचा आणि लग्नाच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात ओढायच. त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करून नंतर बलात्कार करून फोटो आणि व्हिडिओ काढायचा त्यानंतर त्या फोटोचा आणि व्हिडिओचा वापर करून तो तरुणींना ब्लॅकमेल करायचा आणि तरुणींकडून पैसे त्याचबरोबर दागिने घ्यायचा.
मात्र याबाबत एका तरुणीने तक्रार दिली असता पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास केला आणि आरोपीला अटक केली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार या आरोपीने पहिल्यांदा मैत्री केली त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले आणि नंतर लग्नास नकार दिला. अशा प्रकारे फसवणुकीचे आणि बलात्काराचे एक नव्हे तर तब्बल तीन गुन्हे आरोपी विरोधात दाखल करण्यात आले आहेत. सध्या पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली असून अधिक तपास करत आहेत.