Crime News । भयानक! सावत्र आईसह तीन भावंडं आणि मित्राची निर्घृण हत्या! अखेर १७ वर्षांनी आरोपीला पोलिसांनी पकडले

Crime News Pune

Crime News । वसईतील एक धक्कादायक आणि थरारक हत्याकांड प्रकरण अखेर 17 वर्षांनंतर उलगडले आहे. पोलिसांनी बंगळुरूमधून आरोपी अक्षय शुक्लाला अटक केली आहे. अक्षय शुक्ला हा मूळचा बिहारचा रहिवासी असून त्यावर घरगुती वादातून 5 जणांची हत्या करण्याचा आरोप आहे.

Disha Salian Case । दिशा सालियानच्या वडिलांचा खळबळजनक खुलासा, राजकीय चर्चांना उधाण

हा गुन्हा 17 वर्षांपूर्वी घडला होता. अक्षय शुक्ला आपल्या सावत्र आईसह तीन अल्पवयीन भावंडांची गळा दाबून हत्या केली होती. यानंतर त्याने मित्राची हत्या केली आणि पोलिसांना गुंगारा देण्यासाठी विविध ठिकाणी नाव बदलून राहत होता. त्यावेळी पोलिसांनी खूप प्रयत्न केले तरी तो हत्याकांडानंतर फरार झाला होता.

Supriya Sule । जयकुमार गोरे प्रकरणावर सुप्रिया सुळेंचा घणाघात, सरकारवर गंभीर आरोप

वसई गुन्हे शाखेने अखेर त्याला एका गुप्त माहितीवरून बंगळुरूमध्ये सापळा रचून अटक केली. आरोपीने घरगुती वादातून सावत्र आई आणि तीन भावंडांना हत्या केली होती, त्यानंतर तो वसईत एका मित्राच्या घरी राहू लागला. घरातील जागेवरून त्याने मित्राचीही हत्या केली होती.

Crime News l धक्कादायक! नाशिकमध्ये दुहेरी हत्याकांड, अजित पवार गटाचा नेता आणि त्याच्या भावाची हत्या

या प्रकरणाने वसईत खूप धक्का दिला होता आणि पोलिसांनी 17 वर्षांपासून तपास सुरू ठेवला. याच तपासातून त्यांनी आरोपीला पकडले आणि आता त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिस तपास करत आहेत की, आरोपीने या काळात कोणती बनावट कागदपत्रं वापरली, आणि कुठे कुठे लपून राहिला.

Devendr Fadanvis । रिल बनवणाऱ्या सरकारी अधिकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची महत्वाची घोषणा!

Spread the love