
Crime News । सध्या दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. सध्या देखील अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ठाण्यातून शेजारधर्माला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. या ठिकाणी शेजारी ३७ वर्षीय व्यक्तीने 16 वर्षीय शाळकरी पीडित मुलीचे अंघोळ करतानाचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
कुटुंबाला ठार मारण्याची देखील आरोपीने अल्पवयीन मुलीला धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती मिळत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपीवर गुन्हा दाखल होताच मित्राच्या घरी जाऊन विष प्राशन करीत आत्महत्या केली. या घटनेमुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एका गावात घडली आहे.
Eknath Shinde । “…तेव्हा एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याकडे येऊन रडले” बड्या नेत्याचा दावा
माहितीनुसार, पीडित शाळकरी मुलगी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर 37 वर्षीय आरोपीचा विवाह झाला असून पत्नी त्याला सोडून गेली असून तो पीडित मुलीच्या शेजारी राहत होता. यांनतर त्या मृत आरोपीची नजर त्या मुलीवर पडली आणि तो तिच्यावर अत्याचार करू लागला. आणि ज्यावेळी हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले त्यावेळी आरोपीने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.