Crime News । किरकोळ कारणावरून सतत पती-पत्नीमध्ये वाद होत असतात. अनेकदा हे वाद खूप टोकाला जातात. काही वाद तर पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतात. सध्या जळगाव जिल्ह्यातून देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जी वाचून तुम्हाला देखील धक्का बसेल. पती पत्नीमध्ये किरकोळ वाद झाल्याने पत्नी आपल्या नऊ महिन्यांच्या मुलीला घेऊन माहेरी गेली. यानंतर महिलेचा पती त्या ठिकाणी पोचहला त्यानंतर घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत पोटाच्या मुलीची आणि पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या केली. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेनंतरपतीने स्वत:देखील आत्महत्या केली. विशाल मधुकर झनके असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी या ठिकाणी घडली आहे. या घटनेमुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, विशाल झनके हा मलकापूर तालुक्यातील दुधलगाव या ठिकाणचा रहिवासी असून त्याचे सासर देऊळगाव गुजरी येथे आहे.
Congress । काँग्रेसला पुन्हा मोठा झटका; आणखी एक नेता करणार भाजपात प्रवेश
या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र विशालने असे आपल्या मुलीला आणि पत्नीला का संपवले? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या या घटनेचा अधिकचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे. पोलिसांनी मृतदेह जामनेर येथील ग्रामीण रुग्णालयात नेऊन शवविच्छेदन केले.