Crime News । मुलगी ओरडत होती.. अखेर तिने जीव सोडला तरीही सावत्र आई मारहाण करत राहिली..घटनास्थळी गेल्यावर पोलिसांनाही बसला धक्का

Crime

Crime News । दिवसेंदिवस गुन्हेगारीमध्ये वाढ होत चालली आहे. दररोज अनेक वेगेवेगळ्या प्रकारचे गुन्हे घडतच आहेत. सध्या देखील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सावत्र आईने आपल्या 9 वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण केली. यामध्ये मुलीचा मृत्यू झाला आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यात ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

Ganpat Gaikwad । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना पोलीस कोठडी

पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनाही धक्काच बसला. मारहाण करून तिचा मृत्यू होणार असताना सावत्र आईने आपल्या मुलीला गच्चीवर लपवून ठेवले होते. तेथील गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, महिला सावत्र मुलीशी जनावरांसारखी वागायची. दिवसभर घरातील कामे करून घ्यायची.

Sharad Pawar । लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर होताच शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मुलीचा मृतदेह छतावर लपवला

महिलेने ९ वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केली आणि नंतर तिला मृत समजून छतावर ठेवलेल्या गवताच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवल्याचा आरोप आहे. पोलिसांना ही बाब कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. निरागस बालक मरणासन्न अवस्थेत पडल्याचे पोलिसांनी पाहिले. पोलिसांनी मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल केले. जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

Ganpat Gaikwad Firing । आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचं CCTV आलं समोर; पाहा थरकाप उडवणारा गोळीबाराचा व्हिडीओ

Spread the love