Crime News । सध्या मध्य प्रदेशातील रीवा या ठिकाणाहून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका म्युझिक टीचरने अवघ्या १२ वर्षाच्या मुलाला निर्दयीपणे मारहाण केली आहे. या मारहाणी मध्ये त्या मुलाच्या डोक्याला बेदम मार लागला आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना ऑपरेशन करावे लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, या विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या गंभीर असून तो आयसीयू मध्ये आहे. आरोपी शिक्षिका विरुद्ध पोलिसांनी गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्याची देखील माहिती मिळत आहे. मात्र ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी पासूनच आरोपी शिक्षक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नेमकी का केली शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण?
ही हृदयपिळवून टाकणारी घटना भास्कर स्कूल हायर सेकंडरी स्कूल येथील आहे. २८ ऑगस्ट रोजी १२ वर्षाचा विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत गेला यावेळी नेहमीप्रमाणे वर्ग सुरू झाला आणि वर्गामध्ये म्युझिक टीचरने प्रवेश केला त्यावेळी तो विद्यार्थी त्यांच्या सन्मानार्थ नीट उभा राहू शकला नाही. ही गोष्ट शिक्षक वृषभ पांडे यांना खटकली आणि ते चांगले संतापले. रागाच्या भरात त्यांनी विद्यार्थ्यांच्या जोरदार कानाखाली लगावली. यावेळी त्यांच्या हातात रुद्राक्षांची माळ होती. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला डोक्याला गंभीर मार लागला आणि त्याचे डोळे सुजले.
Viral Video । धक्कादायक! विद्यार्थिनींनी फोडली थेट शिक्षण अधिकाऱ्यांची गाडी, काय आहे प्रकरण?
या सर्व प्रकारानंतर विद्यार्थी थेट रडत रडत घरी पोहोचला त्यानंतर त्याला तात्पुरते औषध देऊन मलमपट्टी करण्यात आली. मात्र तीन दिवसानंतरही विद्यार्थ्यांच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा झाली नाही. याउलट त्याची तब्येत अजूनच बिघडली त्यावेळी त्याला तातडीने संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी त्याचे एमआरआय आणि सिटीस्कॅन करण्यात आले ज्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे सध्या या शिक्षका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाचा शोध सगळीकडे सुरू आहे.