
Crime News । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुन्हेगारांचा सुळसुळाट आहे. आपले वर्चस्व टिकवण्यासाठी गुन्हेगार आपापसात भांडत आहेत. एकमेकांना मारहाण देखील करण्यास गुन्हेगार मागेपुढे पाहत नाहीत. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वर्चस्वासाठी रस्त्यावर दुसऱ्या व्यक्तीला मारहाण करत आहे. दोघेही दारूच्या नशेत होते.
दोघांमध्ये पूर्वीपासूनच वैर असल्याचे बोलले जात आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ जिल्ह्यातील चौबेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे. सध्या पोलीस याची सखोल चौकशी करत आहेत. पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आहे. त्याचा शोध सुरू आहे. एका खोलीत हा व्हिडीओ बनवला होता. जिथे दारूची पार्टी चालू होती. दोन लोक जुन्या प्रकरणावरून आपसातील तक्रारी सोडवण्याचा प्रयत्न करत होते. ते एकमेकांशी भिडले. एका व्यक्तीने दुसऱ्याला मारहाण केली. लोखंडी रॉडने मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Supriya Sule । बारामतीत नागरिकांना धमकावलं जातंय! सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन सिंग असे मारहाण करणाऱ्या तरुणाचे नाव असून तो माकन पुर्वा येथील रहिवासी आहे. रजत कटियार असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो कुर्मी खेडा येथील रहिवासी आहे. या दोघांमध्ये यापूर्वीही वाद झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रजतने अमनच्या मित्राला मारहाण केली होती, या मुद्द्यावरून दोघांमध्ये मतभेद झाले होते. आपसातील मतभेद दूर करण्यासाठी दोन्ही लोक एकमेकांना भेटले. यावेळी दारू पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.