Crime News । मुलीसोबत बोलण्यास मनाई केली म्हणून दोन विद्यार्थ्यांना राग अनावर… शिक्षकावरच झाडली गोळी; व्हिडिओ केला व्हायरल

Crime news

Crime News । सध्या गुन्हेगारीचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. अगदी अल्पवयीन शाळकरी मुलं देखील मोठ्या प्रमाणात मोठे गुन्हे करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या देखील दोन तरुणांनी शिक्षकावर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या विद्यार्थ्यांनी शिक्षकावर गोळ्या झाडल्या आणि या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आहे.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरे यांनी केली सर्वात मोठी मागणी; म्हणाले, “शिंदे सरकारची…”

या व्हायरल व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटल आहे की, “आता फक्त एकच गोळी झाडली आहे अजून 39 गोळ्या बाकी आहेत”असं म्हणत शिक्षकाला खुलेआम जीवे मारण्याची धमकी दिली आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी या दोघांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.

Viral Video | संतापजनक! जेवणाला उशीर झाला म्हणून सासऱ्याने केली सुनेला बेदम मारहाण, पाहा VIDEO

या दोघांपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याची देखील माहिती समोर आली आहे. या आरोपींनी गावठी कट्टा वापरून शिक्षकाच्या पायावर गोळी झाडली आणि दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

IND vs AUS World Cup 2023 । टीम इंडियाला मोठा धक्का! प्रमुख खेळाडूला झाली डेंग्यूची लागण

नेमकं प्रकरण काय?

आग्रायेथील खंदौलीतील मलूपुर या गावातील सुमित सिंह हे एक इन्स्टिट्यूट कोचिंग इन्स्टिट्यूट चालवत होते. यावेळी दोन मुले सुमित यांच्या कोचिंग सेंटर मध्ये शिकत असलेल्या दोन एका मुली सोबत फोनवर बोलत होते. ही गोष्ट सुमित यांना समजली त्यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलांना याबाबतची माहिती दिली म्हणूनच दोन्ही मुलांनी शिक्षक सुमितला धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Animal husbandry । आलिशान कारपेक्षा महाग म्हैस! किंमत जाणून व्हाल थक्क

ही दोन मुले एकदम फिल्मी स्टाईल मध्ये गुरुवारी दुपारी दुचाकीवर बसून सुमित यांच्या कोचिंग सेंटरवर पोहोचली. त्यानंतर त्यांनी गावठी कट्टा काढला आणि सुमितच्या पायावर गोळी झाडली. यामुळे सगळीकडे एकच खळब उडाले आहे. त्यानंतर सुमित यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती मिळत आहे.

Success story । MBA चायवाला नंतर MBA कोंबडीवाल्याची चर्चा! महिन्याला करतोय लाखोंची उलाढाल

Spread the love