पुणे ( Pune) कारागृहातील कैद्याने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या कैद्याला ससून रुग्णालयात ( Sasun Hospital) उपचारासाठी आणले होते. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त देखील होता. मात्र संधी मिळताच या कैद्याने संधी साधली आणि तो पोलिसांची नजर चुकवून फरार झाला. या घटनेमुळे पोलिसांना मनस्ताप झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Sanjay Raut: मोठी बातमी! संजय राऊत उद्या भीमा पाटस कारखान्यासमोर घेणार सभा
त्याच झालं असं की, पुणे येथील ससून रुग्णालयात बाळू म्हणजेच चक्रधर रानबा गोडसे या कैद्याला उपचारासाठी आणले होते. १९ एप्रिलपासून या कैद्यावर उपचार सुरू होते. यावेळी प्रकाश मांडगे व संजय कोतकर हे पोलीस बंदोबस्तासाठी रुग्णालयात उपस्थित होते. दरम्यान प्रकाश मांडगे हे कैद्याला डिस्चार्ज कधी मिळणार ? याबाबत डॉक्टरांकडे चौकशी करायला गेले होते. तेव्हाच कोतकर हे सुध्दा वॉशरूम साठी बाहेर गेले होते.
Yogi Adityanath : ब्रेकिंग! योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी
यावेळी संधी साधून बाळू उर्फ चक्रधर रानबा यांनी हळूच रुग्णालयातून पळ काढला व फरार झाले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना चुकवून व गर्दीत अंधाराचा फायदा घेत कैद्याने रुग्णालयातून पळ काढला. ही बाब लक्षात येताच पोलिसांनी कैद्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. प्रकाश मांडगे यांनी कैद्याविरोधात बंडगार्डन पोलीसठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.