
Crime | दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. छोट्या कारणावरून अनेक मोठं मोठे गुन्हे हे घडतच आहेत. सध्या देखील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पश्चिम बंगालमध्ये हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील मध्यमग्राममध्ये एका 55 वर्षीय बांधकाम साहित्य विक्रेत्याने आपल्या पत्नीचे सहा तुकडे केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून पिशवीत भरून कालव्यात फेकून दिले. हत्येनंतर आरोपी नुरुद्दीन मंडल याने शनिवारी पोलिस ठाण्यात जाऊन पत्नीच्या हरवल्याची तक्रार दाखल केली. आरोपीच्या विवाहित मुलीला तिच्या बेपत्ता आईच्या मोबाईलवर रक्ताचे डाग दिसल्याने हे प्रकरण उघडकीस आले.
Sharad Pawar | राम मंदिराबाबत शरद पवार यांनी केले सर्वात मोठे वक्तव्य!
हा प्रकार मुलीला समजल्यानंतर आरोपी पित्यानेच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर आरोपीला रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात पोलिसांनी चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मंगळवारी पोलिसांनी नोया कालव्यातून विकृत शरीराचे अवयव जप्त केले. आणि आरोपाला अटक करण्यात आली आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, या हत्येमागे मालमत्तेचा वाद असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, आरोपी मंडल त्याची ५० वर्षीय पत्नी सायरा बानू हिच्या जमिनीचा तुकडा घेण्यासाठी दबाव टाकत होता. आरोपीची मुलगी मणी बीबी हिने सांगितले की, तिच्या आईकडे श्रीनगर, मध्यमग्राम येथे जमीन आणि घर आहे. ही मालमत्ता घेण्यासाठी वडील आईवर दबाव आणत होते. मात्र आरोपीच्या पत्नीने याला विरोध केल्यास तिलाच संपवल.
Viral News | लग्नासाठी मुलगी न मिळाल्याने तरुणाने उचलले भयानक पाऊल, घटना वाचून बसेल धक्का