
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावर अर्वाच्च्य भाषेत टीका केली आहे. याआधी देखील खूपदा त्यांनी सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांच्यावर टीका केली होती. परंतु, यावेळी अगदी मर्यादा सोडून टीका केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) चांगलाच आक्रमक झाला आहे. इतकंच नाही तर सत्तारांनी 24 तासात सुप्रिया सुळेंची माफी मागावी. अशी धमकी देखील दिली आहे.
दुग्धव्यवसाय तेजीत! पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’; जनावरांच्या किमतीत वाढ..
झालं असं की, सुप्रिया सुळेंनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करताना “पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का ? ” असे म्हंटले होते. यावर उत्तर देताना सत्तार यांनी “ते तुम्हाला हवे आहेत का?” विचारले होते. यावर सुप्रिया सुळे यांनी “तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात.” असे विधान केले. या प्रश्नउत्तरांच्या खेळात अब्दुल सत्तार यांनी आता मात्र भडकून सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
धक्कादायक! ऊसतोड मजुरांना आणण्यासाठी गेलेल्या एका वाहतूकदाराचा खून; वाचा सविस्तर
मर्यादा सोडून टीका करताना अब्दुल सत्तार यांनी “इतकी भिकार….झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ.” असे म्हणाले आहेत. त्यांच्या या बेताल वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. सोबतच येत्या २४ तासात सुप्रिया सुळे यांची नाक घासून माफी मागावी अन्यथा आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात फिरकू देणार नाही. असा गंभीर इशारा (Alert from NCP to Abdul Sattar) देखील दिला आहे.
सावधान! इन्स्टाग्राम वापरताय तर जरा जपून; सोशल मीडियावर प्राध्यापकाची लाखोंची फसवणूक