महाराष्ट्रातील पोरांच्या स्वप्नांचा चुराडा केला – रोहित पवार

Crushed the dreams of boys in Maharashtra - Rohit Pawar

मागील काही दिवसांपासून देशात गुजरात निवडणुकांचा (Gujrat Election 2022) गोंधळ सुरू होता. नुकत्याच या निवडणुका पार पडल्या असून आज या बहुचर्चित निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल लागतोय. यामध्ये आज दुपारपर्यंत तर भाजप 152 जागांसह आघाडीवर होते. त्यामुळे सलग 27 वर्षे सत्तेत असणारे भाजपच पुन्हा सत्तेत येणार अशा चर्चा सर्वत्र सुरू आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत.

“…म्हणून तेथे भाजपची सत्ता”; गुजरात निवडणुकांच्या निकालावर शरद पवारांचे मोठे वक्तव्य

रोहित पवार यांनी ट्विट करत लिहिले की, “महाराष्ट्राच्या युवांच्या नोकरीच्या स्वप्नांना चुरगळून तेच स्वप्न गुजरातच्या युवांना दाखवत स्वतःचं सत्तेचं स्वप्न साकारणाऱ्या भाजपाचं ‘हार्दिक’ अभिनंदन तर हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला नमवत विजयी झालेल्या काँग्रेस आणि आपचंही मनःपूर्वक अभिनंदन”!

भाजपच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘आप’ दिल्लीपुरतच मर्यादीत…;

दरम्यान, आत्तापर्यंत समोर आलेल्या अपडेटनुसार, गुजरातमधील 182 जागांपैकी 157 जागांवर भाजप पुढे आहे. जवळपास 84 जागा भाजपने जिंकल्या आहेत. यामुळे भाजपला गुजरात निवडणुकीमध्ये विक्रमी विजय मिळाला असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

राज्यात एकूण 182 कारखाने सुरू, गाळप हंगाम तेजीत; शेतकऱ्यांना होणार फायदा

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *