
शेतकरी (Farmer)शेतीतून जास्त उत्पादन मिळविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची (crop) लागवड करतात. दरम्यान शेतकरी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड (Planting tomatoes) करतात. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात टोमॅटोची लागवड जास्त प्रमाणात करतात. इतकंच नाही तर आता शेतकरी टोमॅटो लागवड करताना विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून भरपूर उत्पादन काढतात. परंतु अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यामुळे पाहिजे तेवढं उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. बऱ्याचदा टोमॅटोची लागवड पॉलिहाऊसमध्ये (Polyhouse) संरक्षित पद्धतीने किंवा खुल्या क्षेत्रात केली जाते.
मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान पुरात 8 जण बुडाले तर 40 लोक बेपत्ता
शेतकरी पॉलिहाऊसमध्ये विविध प्रकारच्या पिकांची लागवड करून कमी खर्चामध्ये दुप्पट उत्पादन घेतात. महत्वाचं म्हणजे ग्रीन हाऊसमध्ये टोमॅटोची लागवड हा शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय असू शकतो. टोमॅटो लागवड करताना जर विचार केला तर एक महत्वाची बाब लक्षात ठेवावी. ती म्हणजे उन्हाळ्यामध्ये जास्त तापमान असते आणि हिवाळ्यामध्ये धुके या वातावरणातील बदलांमुळे टोमॅटोच्या उत्पादनात घट होत असते.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार 22 कोटींची नुकसान भरपाई
ग्रीन हाऊस शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण
जर टोमॅटो लागवडीतून तुम्हाला जास्त उत्पादन पाहिजे असेल तर त्यासाठी तापमान देखील 16 ते 22 अंश सेल्सिअस पर्यंत असणे गरजेचे असते. त्यामुळं टोमॅटो उत्पादनावर येणाऱ्या समस्या नष्ट करण्यासाठी ग्रीन हाऊस शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरते. जर तुम्हाला ग्रीन हाऊसमध्ये टोमॅटो लागवड करायची असेल तर त्यासाठी पुसा दिव्या, अभिमान, पंत बहार, अर्का रक्षक, पुसा चेरी टोमॅटो एक, लक्ष्मी, एन डी टी 120, एनडीटी 5, एचटी 6 या व इतर महत्त्वाच्या जाती उपयुक्त ठरतील.
अशा पद्धतीने ग्रीन हाऊसमध्ये करा टोमॅटोची लागवड
टोमॅटो लागवडीसाठी ग्रीन हाउस किंवा पॉलिहाऊसमध्ये संरक्षित रचनेत अगोदर रोपवाटिकेमध्ये आधी सुधारित बियाण्यांचा वापर केला जातो. दरम्यान यातून मग टोमॅटोची रोपे तयार केली जातात. तसेच या रोपांची पुनर्लागवड केली जाते. दरम्यान या रोपवाटिकेसाठी साधारणपणे 80 ते 100 ग्रॅम टोमॅटोचे बियाणे प्रति एकर बेडमध्ये लावले जाते. या लागवडीनंतर पाच ते सहा आठवड्यांनी रोपे तयार होतात. ही रोप तयार झाल्यानंतर त्यांची पुन्हा पुनर्लागवड केली जाते. ही पुनर्लागवड करताना उंच वाफे किंवा बेड तयार केले जातात. जर तुम्हाला टोमॅटो लागवड 1000 चौरस मीटरच्या ग्रीन हाऊसमध्ये करायची असेल तर सुमारे 2 हजार 400 ते 2600 रोपे लावली जातात.