Site icon e लोकहित | Marathi News

ड्रॅगन फ्रुट,किवीसारख्या विदेशी फळांची करा लागवड, ‘या’ योजनेअंतर्गत मिळेल अनुदान

Cultivation of exotic fruits like dragon fruit, kiwi will get subsidy under this scheme

मुंबई : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार (Central government) आणि राज्य सरकारांकडून (state government)विविध योजना राबविल्या जातात. तसेच शेतकऱ्यांना (farmers) विविध फळबागांच्या (orchards) आणि फूल पिकांच्या लागवडीसाठी आर्थिक मदत मिळावी आणि शेतकऱ्यांचे प्रोत्साहन वाढावे यासाठी सरकारकडून विविध योजना (scheme) राबवल्या जातात. दरम्यान ‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23’ या योजनेच्या माध्यमातून विदेशी फळ लागवड आणि त्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान (grant) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Bjp: दिंडोशीमध्ये गणेश विसर्जनाच्यावेळी भाजपच्या दोन गटांमध्ये झाला तुफान राढा

या योजना राबवण्यामागे शासनाचा उद्देश आहे की, विविध प्रकारची फळे आणि फुले वाढवावी व पर्यायाने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे हा त्यामागचा उद्देश आहे. विदेशी फळे पिकांमध्ये प्रामुख्याने ड्रॅगन फ्रुट,किवी आणि अंजीर यासारख्या फळपिकांचा समावेश होतो. महत्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत या विदेशी फळांसाठी प्रति हेक्‍टरी खर्चाची मर्यादा ही चार लाख रुपये आहे. तसेच एकूण खर्चाच्या 40 टक्के आणि जास्तीत जास्त एक लाख 60 हजार रुपये प्रतिहेक्‍टर अनुदान यामध्ये देय आहे. आता जर एखाद्या शेतकऱ्याला स्ट्रॉबेरी लावायची असेल तर त्यासाठी खर्च मर्यादा ही दोन लाख 80 हजार रुपये आहे.

Devendra Fadanvis: “तेवढी आमच्या सरकारमध्ये हिंमत होती, कारण रात्री 2 वाजता…”, फडणवीसांचा आघाडी सरकारवर घणाघात

तसेच या खर्च मर्यादेत एकूण खर्चाच्या 40 टक्के किंवा 1 लाख 12 हजार रुपये अनुदान यामध्ये देण्यात येणार आहे. दरम्यान एवढेच नाही तर ड्रॅगन फ्रुट, अवॅकॅडो,ब्लूबेरी इत्यादी फळपिकांसाठी एक लाख रुपये प्रति हेक्‍टरी खर्चाची मर्यादा निश्‍चित आहे.तर या एक लाख रुपये खर्चाच्या 40 टक्के किंवा जास्तीत जास्त चाळीस हजार रुपये अनुदान या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

‘या’ दिवशी ‘अतिवृष्टीग्रस्त’ शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार पैसे जमा; मदतीसाठी जीआर निघाला

खरतर या योजनेचे वैशिष्ट्य पहिली तर यामध्ये विदेशी फळे, फुले , मसाला पिकांची लागवड तसेच जे काही जुन्या फळबागा असतील त्यांचे पुनरुज्जीवन इत्यादी घटकांचा यामध्ये समावेश या योजनेत करण्यात आला आहे. दरम्यान जे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.तसेच या योजनेविषयी जर कोणाला अधिक माहिती पाहिजे असेल तर त्यांनी त्यांच्या नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन फलोत्पादन संचालक कैलास मोते यांनी केले आहे

Spread the love
Exit mobile version