Cyclone Michaung । बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र चक्रीवादळामुळे देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. भारतीय हवामान खात्याने 6 आणि 7 डिसेंबर रोजी अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आंध्रप्रदेशातील बाधित जिल्ह्यांमध्ये प्रचंड विध्वंस दिसून आला आहे. अनेक रस्ते खराब झाले, नद्या, कालवे, तलाव फुटले आणि हजारो एकरातील पिके पाण्याखाली गेली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी तात्काळ मदत कार्यासाठी २२ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यात 52 पुनर्वसन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत, जिथे 60,000 हून अधिक लोक राहू शकतात. चार लाख टन धान्य ओले होण्यापासून वाचवण्यासाठी राज्य सरकारकडूनही उपाययोजना केल्या जात आहेत. एलुरु जिल्ह्यात शाळा बंद करण्यात आल्या आहेत. (Cyclone Michaung)
एनडीआरएफच्या 29 तुकड्या तैनात
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मदत आणि बचाव कार्य करण्यासाठी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा आणि पुद्दुचेरीमध्ये एकूण 29 NDRF पथके तैनात करण्यात आल्या आहेत. तमिळनाडूमध्ये (चेन्नईमध्ये 5), आंध्र प्रदेशमध्ये 11, तेलंगणामध्ये एक आणि पुद्दुचेरीमध्ये 14 NDRF टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
Dinesh Phadnis । मनोरंजनसृष्टीवर शोककळा! ‘सीआयडी’ फेम अभिनेत्याचं निधन
चेन्नईमध्ये पावसामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे
वृत्तसंस्था पीटीआयच्या मते, मंगळवारी चेन्नई आणि आसपासच्या विविध पावसाशी संबंधित घटनांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आणि 11 लोक जखमी झाले, ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाणी तुंबलेल्या भागात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बोटी आणि ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला.
Crime News । हृदयद्रावक घटना! नवऱ्यानेच केली बायकोची हत्या, मृतदेह ड्रममध्ये भरून जंगलात फेकले