
Cyclone Michaung । चक्रीवादळ मिचॉन्ग सोमवारी (डिसेंबर) तीव्र चक्री वादळात बदलले. हे नेल्लोरच्या दक्षिण-पूर्वेस 80 किमी आणि चेन्नईच्या उत्तर-ईशान्येस 120 किमी मध्यभागी आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मिचॉन्ग चक्रीवादळ 5 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशातील बापटलाजवळ नेल्लोर आणि मछलीपट्टनम दरम्यान धडकू शकते. हे चक्रीवादळ उद्या दुपारी नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. (Cyclone Michaung)
Rohit Pawar । राष्ट्रवादी संघर्षावर रोहित पवारांचं मोठे विधान; म्हणाले…
मिचॉन्ग चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागरावर फिरत असून आंध्र किनारपट्टीकडे सरकत आहे. हवामान खात्याने सांगितले की, तीव्र चक्रीवादळ पश्चिम मध्य आणि लगतच्या दक्षिण आंध्र प्रदेश, दक्षिण-पश्चिम बंगालचा उपसागर आणि लगतच्या उत्तर तामिळनाडूच्या किनारपट्टीकडे सरकले आहे. या काळात त्याचा वेग ताशी १२ किमी होता.
त्यामुळे तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. या काळात, चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम, नागापट्टिनम, तिरुवल्लूर आणि कुड्डालोर जिल्ह्यांसह उत्तर किनारपट्टीवरील तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली.
चेन्नईमध्ये पुरामुळे मोठे नुकसान
एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, चेन्नई पोलिसांनी आतापर्यंत पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन मृत्यूची नोंद केली आहे. चेन्नईचा बहुतांश भाग जलमय झाला असून सखल भागात पूर आला आहे. याशिवाय आजूबाजूच्या अनेक भागात पूर आला आहे. येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (NDRF) बचावकार्य सुरू केले आहे.