
Cyclone Michong । चक्रीवादळ मिचॉन्गशी मुकाबला केल्यानंतर तामिळनाडूला मंगळवारी पावसापासून थोडासा दिलासा मिळाला. आता ते कमकुवत होऊ लागले आहे पण या वादळामुळे सर्वसामान्यांचे जे नुकसान झाले आहे त्यातून सावरायला वेळ लागेल. जर आपण तामिळनाडूबद्दल बोललो तर, मिचॉन्गच्या आगमनाच्या काही तासांपूर्वी आलेल्या पुरामुळे एकट्या चेन्नईमध्ये किमान 17 लोकांचा मृत्यू झाला आहे.
Sharad Pawar । शरद पवार यांना मोठा धक्का! निकटवर्तीयाला न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन नामंजूर
मिचॉन्गमुळे प्रभावित झालेल्या अनेक शहरांमध्ये अजूनही मोबाईल कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकही हैराण झाले आहेत. तथापि, राज्य सरकारचा दावा आहे की त्यांनी 80 टक्के वीजपुरवठा आणि 70 टक्के मोबाइल नेटवर्क कनेक्टिव्हिटी पूर्ववत केली आहे. तामिळनाडूच्या मुख्य सचिवांनी सांगितले की, शहरात 42,747 मोबाइल फोन टॉवर आहेत, त्यापैकी 70 टक्के सध्या कार्यरत आहेत. (Heavy Rain )
Breaking News । महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलणार? पाहा नेमकं काय म्हणाले राज्यपाल?
केंद्राकडे ५ हजार कोटींच्या मदतीची मागणी
मिचॉन्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीनंतर तामिळनाडूच्या सरकारने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. मिचॉन्गमुळे झालेल्या पावसामुळे राजधानी चेन्नई आणि अनेक जिल्ह्यांतील पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचे स्टॅलिनच्या नेतृत्वाखालील सरकारने म्हटले आहे. ते पुन्हा बांधण्यासाठी आणि लोकांना दिलासा देण्यासाठी भारत सरकारने त्यांना 5 हजार कोटी रुपयांची अंतरिम मदत पाठवावी.
#WATCH | Tamil Nadu: Several streets in Chennai submerged after heavy rainfall, boat rescue operations underway
— ANI (@ANI) December 6, 2023
(Visuals from AGS Colony, Velachery) pic.twitter.com/JFeXIEQWo5
सगळीकडे पाणीच पाणी
द्रमुकने म्हटले आहे की त्यांच्या राज्यात दोन दिवसांत सुमारे 33 सेंटीमीटर पाऊस पडला असून यामुळे गेल्या 47 वर्षांचा विक्रम मोडला आहे. द्रमुक नेते वारंवार सांगत आहेत की 2015 मध्ये त्यांनी ज्या परिस्थितीचा सामना केला त्यापेक्षा ही परिस्थिती खूपच वाईट आहे. तमिळनाडूचे फोटोही व्हायरल होत आहेत ज्यात तेथील अनेक भाग पाण्यामध्ये पूर्णपणे बुडालेले दिसत आहेत. काल तामिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यातून ड्रोन शॉटद्वारे फोटो काढण्यात आले तेव्हा सर्वत्र पाणी साचलेले दिसत होते.
#WATCH | A local hotel staff helps a foreign guest to cross a waterlogged street to reach his car in Chennai's Arumbakkam area pic.twitter.com/Errdcdp9Rf
— ANI (@ANI) December 6, 2023