
मुंबई : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (cyrus mistri)यांच्या गाडीचा रविवारी (४ सप्टेंबर) पालघरमध्ये दुपारी सव्वा तीनच्या सुमारास हा अपघात (accident) झाला. अपघात येवढा भीषण होता की मिस्त्री यांचा जागीच मृत्यू (dies)झाला. दरम्यान उद्या मंगळवारी (६ सप्टेंबर) सकाळी १० वाजता मुंबईमधील वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार(Cremation on the body) करण्यात येणार असल्याची माहिती मिस्त्री यांच्या कुटुंबाने दिली.
Amit Shaha: अमित शहा मुंबई दौऱ्यावर, अरविंद सावंतांचे शहांच्या टीकेला प्रत्युत्तर
या अपघातात मिस्त्री यांच्यासह जहांगीर दिनशा पंडोल यांचाही मृत्यू झाला आहे. तर डॉ. अनायता पंडोल आणि दरीयस पंडोल हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मिस्त्री यांची मर्सिडिस कार डिव्हायरला धडकल्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती पालघर पोलीस अधिक्षकांनी दिली आहे.गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Amit Shah: “राजकारणात काहीही सहन करा, पण धोका नाही..”, अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हे होत अपघातच कारण
मिस्त्री यांच्या गाडीचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.गाडीच्या वेगाचा अंदाज चालकाला न आल्याने हा अपघात झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाडी पुलावर आली तेव्हा ती निर्धारित वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावत होती.