मेरठ (Merath) येथे अखिल भारतीय किसान मेळा आणि कृषी उद्योग प्रदर्शन सुरू आहे. दरम्यान या भरलेल्या कृषी उद्योग प्रदर्शनात (Agricultural Industry Exhibition) गोलू टू (2) नावाचा म्हैस रेडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या म्हैस रेड्याची (Buffalo Reda ) किंमत तब्बल 10 कोटी रुपये आहे. खरतर या रेड्याचे वैशिष्ठ पहायचं म्हणले तर, याची उंची साडेपाच फूट आणि लांबी 14 फूट आहे. इतकंच नाही तर या गोलूच्या शरीराचे वजन दीड टन आहे. दरम्यान हा रेडा त्याच्या मालकाला दरवर्षी लाखों रुपयांची कमाई करुन देतो.
विशेष म्हणजे गोलूच्या शेतकर्याला पशुपालनाच्या क्षेत्रात पद्मश्रीही मिळाली आहे. शेतकरी नरेंद्र सिंह यांच्या मालकीचा गोलू नेहमी देशभरात चर्चेत राहतो. नरेंद्र सिंह हे हरियाणातील पानिपतमधील दिदवाडी गावचे रहिवासी आहेत. नरेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोलू 2 चे वय आता साडेचार वर्षे आहे. महत्वाची बाब म्हणजे गोलू 2 चे आजोबा गोलू वन होते आणि वडील पीसी 483 होते. हे दोघे हरियाणा सरकारला भेट म्हणून देण्यात आले होते.
चक्क इंजिनीअरची नोकरी सोडून पाळल्या गायी,आता महिन्याला कमवतोय लाखो रुपये; वाचा सविस्तर
पुढे बोलताना नरेंद्र सिंह म्हणाले की, आम्ही गोलूचे पालनपोषण एका म्हशीसारखे नाही तर आमच्या मुलासारखे करतो. इतकंच नाही तर आमचे संपूर्ण कुटुंब आणि पाच नोकर गुंतलेले आहेत. येवढं लोक याच्या सेवेसाठी आहेत याच कारण म्हणजे गोलू 2 चे चालणे चांगले आणि पालनपोषण चांगले होईल. दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे हरियाणातील एका शेतकर्याने गोलू 2 च्या बदल्यात 20 एकर जमीन देण्याची ऑफर दिली होती. परंतु नरेंद्र सिंह त्यांनी नकार दिला.
मोठी बातमी! अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली…
गोलू 2 ची ‘ही’ आहे खासियत
1) गोलू 2 मुऱ्हा म्हशीची जात आहे.
2) त्याचे वजन दीड टन असावे.
3) उंची साडेपाच फूट आहे.
4) लांबी 14 फूट आहे.
5) वीर्याचे 7000 – 800 डोस दर आठवड्याला विकावे.
6) 100 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत वीर्य विकले जाते.
7) फेब्रुवारी ते जुलै या काळात वीर्य सर्वाधिक विकले जाते.
गोलू २ चा ‘हा’ आहे खुराक
1) सुका हिरवा चारा – 30 किलो
2) फीड – 8 किलो
3) खनिज मिश्रण
4) दरमहा 30 ते 40 हजार खर्च
Urfi Javed: उर्फीने चक्क फुफ्फुसांच्या आकाराचा ड्रेस केला परिधान, पाहा VIDEO